📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

राजर्षी शाहू कन्या विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

राजर्षी शाहू कन्या विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
“श्रीमती एस. डी. कदम आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित “
बीड : श्री छत्रपती राजर्षी शाहू समाज प्रबोधन मंडळ, बीड संचलित राजर्षी शाहू कन्या प्राथ व माध्य.विद्यालय आणि राजमाता इंग्लिश यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन आणि स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष इंजि. बलभीमराव जाहेर पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव प्रा. जे. पी. शेळके उपस्थित होते. यावेळी श्रीमती एस. डी. कदम, श्री. आर. टी. राऊत, श्रीमती आर. डी. लोखंडे, श्री. जी. एस. झोडगे, श्री. के. बी. सोंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या स्वयंशासन दिनात विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रशासकीय व्यवस्थेची धुरा समर्थपणे सांभाळत नेतृत्व, नियोजन, शिस्त आणि निर्णयक्षमतेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. कु. अनुष्का जाधव यांनी मुख्याध्यापिकेची, कु. प्राची चव्हाण यांनी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिकेची, तर कु. दिव्या वैद्य यांनी राजमाता इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिकेची भूमिका प्रभावीपणे पार पाडली. विद्यार्थिनींनी शिक्षक व प्रशासकीय जबाबदाऱ्या आत्मविश्वासाने पार पाडल्याने स्वयंशासन दिनाला विशेष रंगत आली.
यावेळी ‘श्री छत्रपती शाहू आदर्श शिक्षक जीवनगौरव पुरस्कार २०२६-२७’ प्रदान करण्यात आला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. डी. कदम यांना त्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्याची दखल घेत सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीत शिक्षकांची भूमिका आणि विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. शिवानी खराडे यांनी केले. कु. अनुष्का जाधव यांनी आपल्या मनोगतात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याची माहिती देत शिक्षक दिन साजरा करण्यामागील प्रेरणा व भूमिका स्पष्ट केली. प्रमुख पाहुणे प्रा. जे. पी. शेळके यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारांचा आणि जीवनकार्याचा आढावा घेत शिक्षक हा समाजाच्या जडणघडणीतील महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले. आदर्श शिक्षक जीवनगौरव पुरस्कार देण्यामागील हेतू स्पष्ट करत त्यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षिका श्रीमती एस. डी. कदम यांचे अभिनंदन केले.
अध्यक्षीय मनोगतात इंजि. बलभीमराव जाहेर पाटील यांनी स्वयंशासन दिनाचे उत्कृष्ट नियोजन आणि विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले. शिक्षकाचे जीवनातील स्थान आणि गुरूचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका अत्यंत मोलाची असल्याचे सांगितले. तसेच पुरस्कारप्राप्त शिक्षिका श्रीमती एस. डी. कदम यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. श्री. के. बी. सोंडगे यांनीही मनोगत व्यक्त करून पुरस्कारप्राप्त शिक्षिकेचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. राजनंदिनी डावकर हिने तर आभार कु. ज्ञानेश्वरी नागरगोजे हिने मानले.
Back to top button