📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

८ दिवसांत दुसरा जीवघेणा हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना कोर्टाचा दणका; कीर्तनकार कैलास महाराज आनंदे यांच्यावरील कोयता हल्ल्यातील आरोपींचा जामीन पुन्हा फेटाळला

८ दिवसांत दुसरा जीवघेणा हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना कोर्टाचा दणका; कीर्तनकार कैलास महाराज आनंदे यांच्यावरील कोयता हल्ल्यातील आरोपींचा जामीन पुन्हा फेटाळला

सुर्योदय प्रतीनीधी: सुरेश आहेर

Sessions Court मध्ये दोनदा, तर High Court मध्येही जामीन नाकारला; ॲड. मंगेश पोकळे यांचा प्रभावी युक्तिवाद यशस्वी!
पहिल्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर अवघ्या ८ दिवसांत कायद्याची थरेथरे उडवत, भररस्त्यात कीर्तनकारावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. बीडच्या सत्र न्यायालयाने (Sessions Court) दुसऱ्यांदा आणि यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (High Court) आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य, आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि फिर्यादीच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन न्यायालयाने हा कडक निर्णय दिला असून, आरोपींचा जेलमधील मुक्काम आता आणखी वाढला आहे.
📌 काय आहे नेमके प्रकरण?
गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा गेवराई शासकीय दूध संघाजवळ एका रुग्णवाहिकेला (अँब्युलन्स) अडवून फिर्यादी कीर्तनकार कैलास महाराज आनंदे रा.ठाकर आडगाव यांच्यावर अत्यंत निर्घृण आणि जीवघेणा हल्ला करण्यात आला होता  हक्काच्या सप्ताह वर्गणीचा हिशोब विचारला, याच कारणावरून आणि जुन्या केसमध्ये फिर्यादीचा भाऊ मुख्य साक्षीदार असल्याच्या पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला होता . आरोपींनी हातात कोयता, लाकडी दांडके आणि मोटारसायकलचे शॉकअप घेऊन कैलास महाराज आनंदे यांना बेदम मारहाण केली  या हल्ल्यात महाराजांचे दोन्ही हात फॅक्चर झाले होते . हा संपूर्ण थरार तिथल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यात आरोपी हातात कोयता घेऊन क्रूरपणे मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत.
या गंभीर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी खालील मुख्य संशयित व सराईत आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत:
१) संदीपान अरुण कोकाट
२) महेश उर्फ शाम शहादेव पटके
३) विशाल रामा कोकाट
४) आकाश मारुती सोनवणे
५) ओमकार बाळासाहेब गव्हाणे
(यांच्यासह इतर ५ ते ६ अनोळखी इसम)
⚖️ न्यायालयात जोरदार युक्तिवाद:
आरोपींनी पोलिसांचा तपास पूर्ण होऊन चार्जशीट (आरोपपत्र) दाखल झाल्याचा आधार घेत पुन्हा एकदा बीड सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या सुनावणीदरम्यान फिर्यादी कैलास महाराज आनंदे यांच्या वतीने सरकारी अभियोक्त्यांच्या सोबतीने प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. मंगेश पोकळे यांनी बाजू मांडली.
ॲड. मंगेश पोकळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की:
१) मुख्य आरोपींना पहिल्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर अवघ्या ८ दिवसांत त्यांनी हा दुसरा गंभीर गुन्हा (कलम १०९ BNS – खुनाचा प्रयत्न) केला आहे.
२) समाज प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकारावर अशा प्रकारे सराईत गुन्हेगारांनी हल्ला करणे अत्यंत गंभीर आहे.
३) केस मधील अजून दोन आरोपी पोलीस रेकॉर्डवर फरार आहेत.
“आरोपी जामिनाचा गैरवापर करणारे असून त्यांना बाहेर सोडल्यास फिर्यादी कैलास महाराज व साक्षीदार जीवाला मोठा धोका निर्माण होईल,” हा ॲड. मंगेश पोकळे व सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. सत्र न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळून लावला.
🚨 फरार आरोपींचा शोध कधी लागणार?
या गंभीर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार जेलमध्ये असले, तरी त्यांचे काही साथीदार अद्यापही फरार आहेत  तपास अधिकारी संजय मनोहर उदगीरकर (SI) या फरार आरोपींचा शोध घेत आहेत  सत्र न्यायालयाने दोन वेळा आणि हायकोर्टाने एक वेळा जामीन नाकारल्यामुळे पीडित कीर्तनकार कैलास महाराज आनंदे आणि भाविक भक्तांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाला असून, आता फरार आरोपींनाही तात्काळ अटक करून कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी गेवराई परिसरातून होत आहे.
——————————

Back to top button