📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

शेतातील विद्युत मोटारीची वायर/केबल अज्ञातांकडून चोरी; उमापूर परिसरातील शेतकऱ्यांची पोलिसांत सामूहिक तक्रार

शेतातील विद्युत मोटारीची वायर/केबल अज्ञातांकडून चोरी; उमापूर परिसरातील शेतकऱ्यांची पोलिसांत सामूहिक तक्रार
उमापूर, प्रतिनिधी सुरेश आहेर
 दि. 4 सप्टेंबर २०२६ रोजी रात्री
उमापूर परिसरातील नदुखाना शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरींवर बसविण्यात आलेल्या विद्युत मोटारपंपांची वायर केबल अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी उमापूर परिसरातील शेतकऱ्यांनी चकलंबा पोलिस ठाणे अंतर्गत उमापूर चौकीत सामूहिक तक्रार अर्ज दाखल करून चोरट्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, दि. ४ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून ते ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या कालावधीत शेतकरी शेतात गेले असता त्यांच्या विहिरीवरील विद्युत मोटारपंपतील वायर केबल गायब असल्याचे निदर्शनास आले. अज्ञात व्यक्तींनी मोटारपंपातील वायर केबल चोरी करून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, एकूण १2 शेतकऱ्यांच्या मोटारपंपांची वायर केबल चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. चोरी गेलेल्या मोटारपंपांचे वायर केबल चोरी गेल्यामुळे शेतीच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे आहे.
शेतकऱ्यांनी पोलिसांकडे घटनेचा तपास करून चोरी करणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घ्यावा आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जावर संबंधित आप्पासाहेब गोविंद राऊत शिवाजी बबन गिरी नंदकुमार बळवंतराव सातभाई गणपत हाऊसराव घुले आप्पासाहेब माणिकराव घुले लक्ष्मण विठोबा तांबे संतोष राजाभाऊ राऊत रमेश नागनाथ सोनवणे चंद्रकांत बाळकृष्ण कुलकर्णी भीमराव भाऊराव राऊत दत्तात्रेय अंबादास गावंडे महादेव तुळशीराम राऊत या शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पुढील तपास महापूर चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चांदमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राजाभाऊ वंजारे व हनुमान इंगोले साहेब हे करीत आहेत
Back to top button