बीड

पुस्तकी ज्ञानाबरोबर संस्कारही महत्त्वाचे- नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी

पुस्तकी ज्ञानाबरोबर संस्कारही महत्त्वाचे- नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी

ऐतिहासिक जि.प. प्राथमिक शाळा, मराठी मुले येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

जामखेड प्रतिनिधी :

पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास आवश्यक आहे. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळतो. शाळेत मिळालेले धडे, शिस्त आणि संस्कार हेच विद्यार्थ्यांच्या आयुष्यात पुढे यशाची गुरुकिल्ली ठरतात,असे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्थानावरून जामखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी बोलताना म्हणाल्या.

शहरातील ऐतिहासिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मराठी मुले येथे मंगळवार दिनांक २४ मार्च २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून तसेच दिप प्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्ष पोपट राळेभात,जामखेड नगर परिषदेचे शिक्षण समितीचे सभापती ॲड.प्रविण सानप, बांधकाम समितीचे सभापती मोहन पवार,नगरसेविका नंदा होळकर,संगिता भालेराव,माजी नगरसेवक अमित चिंतामणी,शिवसेनेचे युवा नेते आकाश बाफना,सामाजिक कार्यकर्ते नासीर सय्यद, दैनिक सुर्योदय चे उपसंपादक धनराज पवार तसेच केंद्रप्रमुख राम निकम, केशव गायकवाड,माजीद शेख,पांडुरंग मोहळकर,मुख्याध्यापक जालिंदर अहिरे(मराठी मुले),दत्तात्रय यादव(मराठी मुली),मच्छिंद्र खैरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन टेकाळे,प्रा.डाॅ.शिवाजी राळेभात,निलेश गायकवाड आदी मान्यवर, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना चिंतामणी म्हणाल्या,या स्नेहसंमेलनातून सादरीकरण करणारे विद्यार्थी भविष्यात शिक्षक,डॉक्टर, कलाकार, संगीतकार तसेच अभियंते बनतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून ध्येय निश्चित करावे आणि ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आल्याबद्दल त्यांनी शिक्षक व शाळा व्यवस्थापनाचे कौतुक केले.

यावेळी नगर परिषद शिक्षण विभागाचे सभापती ॲड. प्रविण सानप यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, त्यांचे बालपण आणि शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच झाले असून वडिलांचे शिक्षण झाले असून त्या शाळेबद्दल त्यांना विशेष अभिमान आहे. आम्ही याच शाळेत घडलेलो आहोत,असे सांगताना त्यांनी त्या काळातील शिक्षणाच्या आठवणींना उजाळा दिला.जिल्हा परिषद शाळेबद्दल अभिमान व्यक्त करत, या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी नगर परिषदेकडून पुढाकार घेतला जाईल, असे सांगितले.

केंद्रप्रमुख राम निकम यांनी बोलताना सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना विविध कलागुण दाखवण्यासाठी स्नेहसंमेलनासारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा संधींमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून ते भविष्यात मोठे अधिकारी, उद्योजक व कलाकार बनू शकतात.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यापिका वंदना मोरे,जया चौभारे,राधा डिसले,अलका धाउड,संध्या खंडागळे,कालींदा मेहत्रे,साधना आरडक,सरिता कवडे,कल्पना साबळे, श्रीमती सारिका पोले,शुभांगी साळुंखे,लक्ष्मी जायभाय तसेच नितीन मोहोळकर यांच्यासह जि.प.प्राथ,शाळा मराठी मुली येथील शिक्षक अंबादास जोगदंड, संतोष ससाणे तसेच शिक्षिका निशा कदम,अर्चना भोसले,निर्मला सिद्धेश्वर,सोनाली झोरे,प्रतिभा ढोबळे पाटील,भारती क्षिरसागर,मनीषा पवार आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक जालिंदर अहिरे व सुत्रसंचलन ज्ञानेश्वर कोळेकर यांनी केले तर आभारप्रदर्शन सागर माकुडे यांनी मानले.विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलांचे सादरीकरण करत उपस्थित मान्यवर व पालकांची मने जिंकली.

Back to top button