रायगड

जीवाची बाजी लावून वणवे विझवणाऱ्या नागरिकांचा सुधागड-पाली वनविभागातर्फे सन्मानपत्र देऊन गौरव

जीवाची बाजी लावून वणवे विझवणाऱ्या नागरिकांचा सुधागड-पाली वनविभागातर्फे सन्मानपत्र देऊन गौरव

रायगड जिल्हा उत्तर उपसंपादक/मंगेश यादव

सुधागड वनपरिक्षेत्रातील काही जाबाज नागरिकांनी जीवाची बाजी लावून वणवे विझवण्यासाठी मोलाचे योगदान दिले. या नागरिकांनी वणवे विझवण्यास वनविभागास सहकार्य करून वन संरक्षण व संवर्धनाचे काम केल्याबद्दल त्यांना सुधागड-पाली वनविभागातर्फे गुरुवारी (ता.1) सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
तालुक्यात मागील काही दिवसांत विविध ठिकाणी वणवे लागले होते. यावेळी येथील स्थानिक नागरिक वणवे विझवण्यासाठी पुढे आले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे वनांचे मोठे नुकसान होणे टळले. शिवाय पशुपक्षी व जैवविविधतेचे नुकसान होण्यापासून वाचले. या कार्याची दखल घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी सुधागड विशाल सोनवणे यांनी घेतली. आणि या सर्व नागरिकांना उप वनरक्षक अलिबाग वनविभाग अलिबाग यांच्या मान्यतेने सन्मानपत्र दिले.
दत्तात्रय विश्वनाथ सावंत. रा. पाली, अमित वसंत निंबाळकर. रा पाली, शंतनू रविंद्र लिमये रा. पाली, मिलींद बाळाराम गोळे रा. पाली, गुलाब लक्ष्मण हिरवे रा. कळंब, नथुराम हडक्या चव्हाण रा. आसरे, सदा मोरु शिद. रा. गोंदाव कसईशेत, वामन चाहु वाघमारे. रा गोंदाव कसईशेत. अमित गणपत चव्हाण रा. दिघेवाडी, सादुराम खेळु वारगुडे. रा. शरदनगर, मारुती लक्ष्मण देशमुख. रा. ताडगाव, दिलीप विष्णु देशमुख. रा. वाघोशी, मोरु भागु दळवी रा. भेलीव व रमेश रामजी आखाडे रा. वडाचा माळ या नागरिकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सुधागड विशाल सोनवणे, वनपाल मजरे जांभूळपाडा मनोज साळवी, लिपिक संतोष भिंगारदिवे आदींसह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच युगा विशाल सोनवणे उपस्थित होते.

Back to top button