बीड

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना पत्रकार संघाचा राज्यस्तरीय महाराष्ट्र राजरत्न प्रशासकीय अधिकारी पुरस्कार 2026 जाहीर

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना पत्रकार संघाचा राज्यस्तरीय महाराष्ट्र राजरत्न प्रशासकीय अधिकारी पुरस्कार 2026 जाहीर
बीड प्रतिनिधी:बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने मार्च 2020 मध्ये होणाऱ्या बीड येथील राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये महाराष्ट्राचे राजरत्न प्रशासकीय अधिकारी 2026 या सन्मानाच्या पुरस्काराने मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराच्या निवडीचे लेखी पत्र त्यांना अधिकृतरित्या पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी आणि महिला जिल्हाप्रमुख शेख आयेशा यांनी प्रत्यक्ष भेटून दिले.
बीड येथे जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतल्यापासून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अमुलाग्र निर्णय घेत त्या निर्णयावर अंमलबजावणी सुरू केलेली आहे. प्रामुख्याने बालविवाह थांबवण्यासाठी, बीड जिल्ह्यातील वाढलेली गुंडगिरी थांबवण्यासाठी, सामाजिक सलोखा आणि ऐक्य निर्माण करण्यासाठी, कॉपीमुक्त अभियानामध्ये घेतलेले ठोस निर्णय, तसेच शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि प्रशासकीय सेवेतील गतिमानता यासह सर्वांगीण क्षेत्रांमध्ये त्यांचे काम उल्लेखनीय आहे. त्यांनी सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियमित जनता दरबार सुरू केला. या दरबारातून शेकडो नव्हे हजारो जनतेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागले. अशा कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन पत्रकार संघाच्या वतीने मार्च 2026 मध्ये बीड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मेळाव्यात मान्यवरांच्या शुभहस्ते जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना महाराष्ट्राचे राजरत्न प्रशासकीय अधिकारी पुरस्कार 2026 या सन्मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांनी हा पुरस्कार स्वीकारल्या बाबत पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी आणि महिला जिल्हाध्यक्ष शेख आयेशा यांच्याकडून पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र स्वीकारून कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याची हमी दिली. यामुळे कार्यक्रमातील पुरस्काराची उंची निश्चितच आणखीन उंचावली आहे. त्यांनी पुरस्कार स्वीकारल्याबद्दल पत्रकार संघाच्या जिल्हा शाखेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Back to top button