संपादकीय

२० वर्षांपासून रखडलेले भुयारी गटारीचे काम ; ऋषिकेश खरात यांच्या स्वखर्चातून सुरू

जामखेड प्रतिनिधी : शहरातील प्रभाग क्रमांक ०३ (सध्या प्रभाग क्र. १२) मधील दीर्घकाळ प्रलंबित असलेले अंतर्गत भुयारी गटारीचे काम अखेर सुरू झाले आहे. या भागातील कुंभार गल्ली ते जाधव गल्ली या परिसरात गेल्या १५ ते २० वर्षांपासून भुयारी गटाराचे काम रखडले होते. अखेर प्रभाग क्रमांक ०३ चे इच्छुक उमेदवार ऋषिकेश विष्णूपंत खरात यांनी स्वतःच्या खर्चातून या कामाचा शुभारंभ करून नागरिकांची दीर्घकाळची मागणी पूर्ण केली आहे.

या उदघाटन प्रसंगी ह.भ.प. महेश महाराज देशपांडे, श्रीकांत होशिंग, पोपट राऊत, राजेंद्र देशपांडे, शिवलिंग राऊत, विनायक राऊत, नारायण राऊत, गणेश मेंढकर,भास्कर फलके (टेलर), प्रशांत राऊत, विकास राऊत, सागर जगदाळे, राजेंद्र गुंड, महेश निमोणकर, सचिन सिद्धेश्वर, संतोष पोटफोडे, विठ्ठल जाधव, नितीन देशपांडे, प्रवीण राऊत, डॉ. रोहित राऊत, प्रमोद दाणी, दिपक होशिंग, अनिल बिडकर यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना ऋषिकेश खरात म्हणाले की, प्रभागातील रखडलेली विकासकामे पूर्ण करून, दिलेली आश्वासने पाळत स्वप्नातील प्रभाग एक माॅडेल म्हणून उभा करण्यासाठी येणाऱ्या काळात काम करणार आहे. आजच्या उद्घाटनप्रसंगी लोकांनी दिलेला प्रतिसाद माझ्यासाठी खूप मोठा आहे.

या कामामुळे प्रभागातील नागरिकांना सांडपाणी व स्वच्छतेच्या समस्येतून मोठा दिलासा मिळणार असून, रहिवाशांनी ऋषिकेश खरात यांच्या या पुढाकारातून सुरू असलेले कामाचे कौतुक केले आहे.

Back to top button