📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
संपादकीय

खा.निलेश लंकेंचा जामखेड तालुका दौरा; समस्या त्वरित सोडवण्याचे आश्वासन

जामखेड प्रतिनिधी:
बुधवार १ ऑक्टोबर २०२५ रोजी आहिल्यानगर दक्षिण चे खासदार निलेश लंके यांनी जामखेड तालुक्यातील गावांचा दौरा केला. सोनेगावात रात्री दहा वाजता भेट देऊन त्यांनी गावातील तातडीच्या समस्यांकडे लक्ष दिले. तीन दिवसांपासून वीज नसल्याने शेतजमीन आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

वीज नसल्यामुळे मोबाईल रेंजही नव्हती तरी खासदार लंके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांनी परिस्थितीची सविस्तर माहिती खासदारांना दिली.ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तक्रारी मांडल्या, आणि खासदार निलेश लंके यांनी सर्व समस्या त्वरित सोडवण्याचे आश्वासन दिले.

Back to top button