नाशिक

कावळ्यांची पिसं झडतील, टोचा मारून चोची तुटतील, राऊतांनी लगावला सोमय्यांना टोला

 

नाशिक महानगर पालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबंदी सुरु केली आहे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेने पाठोपाठ आता शिवसेना पक्षांनी सुद्धा जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यात आज पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यांवर आले आहेत यावेळी त्यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांचा समाचार घेतला होता.

ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या धाडीवरुन किरीट सोमय्या हे तपास यंत्रणेचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल महाविकास आघाडीचे नेते विचारत आहेत. कावळ्यांची पिसं झडतील, टोचा मारून चोची तुटतील असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला होता. यावेळी त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणेकडून सुरु असलेल्या कारवाईवर सुद्धा संशय व्यक्त केला होता.

तसेच पुढे बोलताना राऊत म्हणाले की, नाशिक महापालिका अंतर्गत असलेल्या रुग्णलयाला हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालय असं नाव देण्यात आलं. शिवसेना खासदार संजय राऊत आज नाशिकमध्ये आहेत. महापालिका निवडणुकीत आपली कामचं आपल्याला पुढे घेऊन जातील. आगामी निवडणुकीत विरोधी पक्षातील शिवसेना सत्ता स्थानी असेल असं वातावरण आहे. काम ही शिवसेनेची ओळख आहे. ही महापालिका भगव्या झेंड्या खाली जिंकून आणू, असं संजय राऊत म्हणाले.

Back to top button