बीड

आदर्शगाव वंजारवाडी येथे ध्वजारोहन, सांस्कृतिक कार्यक्रम व मान्यवरांची उपस्थितीने प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

आदर्शगाव वंजारवाडी येथे ध्वजारोहन, सांस्कृतिक कार्यक्रम व मान्यवरांची उपस्थितीने प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न
बीड तालुक्यातील वंजारवाडी येथे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय, जि. प. शाळा व मातोश्री विद्यालय येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन करून ध्वजारोहनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ध्वजारोहनानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला.
यानंतर जि. प. शाळा व मातोश्री विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर तसेच महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेवर आधारित विविध गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. लेझीम, लावणी, कोळी नृत्य, शेतकरी गिते, देशभक्तीपर गिते, आदी सादरीकरणांमुळे कार्यक्रमात रंगत आली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे उपस्थित मान्यवर, पालक व ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले.
या कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. ॲड. श्री. सर्जेराव तात्या तांदळे, तर विशेष उपस्थिती आदर्शगाव वंजारवाडीचे सरपंच मा. श्री. वैजिनाथ नाना तांदळे यांच्यासह श्री. लक्ष्मणराव पवारसाहेब, श्री. शहादेव नाना तांदळे, श्री. अंकुश आण्णा खाडे, श्री. पांडुरंग नाना राख, श्री. दिनकर पाटील, श्री. दिलीप खाडे, श्री. औसरमल सर, सौ. मोनाली धुरंधरे, सौ. अर्चनाताई खाडे, श्री. नागरगोजे सर, सौ. डोंगरे मॅडम, श्री. भुतकर सर, श्री. ओमकार कांबळे, श्री. नागनाथ सातपुते, श्री. सुशील ढाकणे, श्री. आजिनाथ खाडे, श्री. विठ्ठल आप्पा, श्री. सोपान तांदळे, श्री. चंद्रहास कुटे, श्री. ज्ञानदेव कुटे, श्री. तात्याराम बापू, श्री. लक्ष्मण पवळ, श्री. संपत कुटे, श्री. नंदु पवळ, श्री. धर्मराज पवार यांच्यासह तरुण बांधव तसेच महिला-पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मा.ॲड. श्री. सर्जेराव तात्या तांदळे यांणी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये, स्वातंत्र्य, समता, बंधुता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी देशासाठी जबाबदार नागरिक होण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमास मातोश्री विद्यालयाचा संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ, जि. प. शाळेतील शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका तसेच शाळेतील विद्यार्थी गावातील महिला पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री. बिनवडे सर, श्री. हनुमंत दादा, श्री. प्रदिप बाप्पु तांदळे, श्री. वाघमारे डी. डी., श्री. लक्ष्मण शेंडगे व सौ. सुरेखा घोडके यांनी विशेष परिश्रम घेतले.
Back to top button