बीड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड तालुकाध्यक्षपदी ॲड.राजेंद्र राऊत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड तालुकाध्यक्षपदी ॲड.राजेंद्र राऊत
राष्ट्रीय प्रवक्ते, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र
बीड (प्रतिनिधी)दि.२९ : तालुक्यातील नाळवंडीचे सरपंच तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ॲड.राजेंद्र राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड तालुकाध्यक्षपदी मंगळवारी (दि.२९) मुंबई येथे निवड करण्यात आली. त्याबद्दल पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
या निवडीची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आ.अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या सूचनेवरून करण्यात आली. मुंबईत छोटेखानी कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे, प्रदेश सरचिटणीस माजी आ.अमरसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर चव्हाण, बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते ॲड.राजेंद्र राऊत यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब घुगे, नवगण शिक्षण संस्थेचे संचालक आमेर सिद्दिकी, माजी नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ, प्रदीप गायकवाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
पक्षबांधणीसाठी अधिक जोमाने काम करणार-ॲड.राजेंद्र राऊत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास ही केवळ सन्मानाची बाब नाही, तर तालुक्यातील पक्षबांधणीसाठी अधिक जोमाने काम करण्याची जबाबदारी आहे, अशी भावना नवनियुक्त तालुकाध्यक्ष ॲड.राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केली. पुढे ते म्हणाले, निवडीबद्दल सर्व पक्षश्रेष्ठी, जिल्ह्यातील नेत्यांचे मी आभार मानतो. माझ्यावर विश्वास दाखवला, तो मी नक्कीच सार्थ ठरवेन. ग्रामीण भागात पक्षाचे विचार व धोरणे पोहोचवणे, नव्या नेतृत्वाला पुढे आणणे, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे हे माझे प्राधान्य असेल. जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणे व सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सदैव पुढे राहणे, ही माझी कार्यपद्धती राहील, असेही ॲड.राजेंद्र राऊत यांनी स्पष्ट केले.



