📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

चिंचाळा येथे मंगळवारी जगदंबा देवी यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

चिंचाळा येथे मंगळवारी जगदंबा देवी यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

आष्टी प्रतिनिधी

चिंचाळा (ता. आष्टी) येथे श्री जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त मंगळवार, दिनांक 21 एप्रिल रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. गावातील ग्रामस्थ, भाविक व यात्रेकरूंच्या उत्साहात दरवर्षीप्रमाणे यंदाही ही यात्रा मोठ्या भक्तिभावाने साजरी होणार आहे.
मंगळवारी सायंकाळी श्री जगदंबा देवीची पारंपरिक पालखी मिरवणूक गावातून मोठ्या उत्साहात काढण्यात येणार असून, ढोल-ताशांच्या गजरात व “जय भवानी, जय जगदंबा”च्या घोषणांनी परिसर दुमदुमणार आहे. त्यानंतर सायंकाळी देवीचा जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, आष्टी येथील “जय भवानी गोंधळ पार्टी” यांच्या वतीने पारंपरिक गोंधळ सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमातून देवीच्या महिम्याचे गायन-वादनाद्वारे सादरीकरण करण्यात येणार आहे.
बुधवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत हजऱ्यांचा कार्यक्रम पार पडणार आहे दुपारी 4 ते 6 या वेळेत जंगी कुस्ती हंगामा आयोजन करण्यात आले असून, परिसरातील नामांकित पैलवान, कुस्तीप्रेमींसाठी हा विशेष आकर्षणाचा भाग ठरणार आहे.
तसेच रात्री 8 ते 10 या वेळेत पुणे येथील नामांकित ऑर्केस्ट्रा पथकाचा रंगतदार कार्यक्रम होणार असून, यामध्ये विविध गाणी व मनोरंजनाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे यात्रेला सांस्कृतिक रंगत लाभणार आहे.
या यात्रेनिमित्त गावात विविध सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात आली असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Back to top button