महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय हाॅटेल रात्री १२ वाजेपर्यंत तर सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी

 

राज्यात करोनाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असून आता मुंबईची मृत्यूची संख्या शुनवैर आली आहे. करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने हॉटेल, उपहारगृह आणि दुकानांच्या वेळ मर्यादा वाढविण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व उपाहारगृहे, हॉटेल्स रात्री १२ वाजेपर्यंत तर सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास ठाकरे सरकारने मान्यता दिली आहे.

राज्यात करोना रुग्णसंख्या आटोक्‍यात येत असल्यामुळे राज्य सरकारने निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल करोना टास्कफोर्ससोबत बैठक झाली. या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्ण संख्या कमी होताना दिसते. २२ ऑक्‍टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांनाही सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांची देखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Back to top button