रायगड

कोळवट येथे ग्रामस्थांवर मधमाश्याचा हल्ला : ४२ जखमी : १३ बालकांचा समावेश

कोळवट येथे ग्रामस्थांवर मधमाश्याचा हल्ला : ४२ जखमी : १३ बालकांचा समावेश

द. रा. जि. उपसंपादक: संतोष उध्दरकर.

म्हसळा:म्हसळा तालुक्यातील कोळवट येथे ग्रामस्थांवर मधमाश्यानी हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना आज (सोमवारी) घडली आहे.

सकाळी ९ वाजल्याच्या सुमारास गावातील सर्व ग्रामस्थ व मुंबईकर गावदेवाच्या मंदिरात आरती करण्यासाठी गेले असताना मधमाश्यानी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात एकूण ४२ जण जखमी झाले असून त्यामध्ये १३ बालकांचा देखील समावेश आहे. २ रुग्णांना अधिक त्रास होऊ लागल्याने पुढील उपचारासाठी त्यांना माणगाव येथील उप जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्या नंतर सर्व जखमीना तातडीने १०८ रुग्णावाहिकेतून म्हसळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.म्हसळा ग्रामीण रुग्णालय व म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी तसेच १०८ रुग्णवाहीका प्रशासनाने घडलेल्या घटनेत तत्परता दाखवल्याने ग्रामस्थानकडून त्यांचे कौतुक करण्यात आले.

Back to top button