📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

डॉ.योगेश क्षीरसागरांच्या आवाहनानंतर रा.काँ. पक्षाकडे इच्छुकांचे दीडशेहून अधिक अर्ज

डॉ.योगेश क्षीरसागरांच्या आवाहनानंतर रा.काँ. पक्षाकडे इच्छुकांचे दीडशेहून अधिक अर्ज

– बीड शहरात रा.काँ.पक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद
– नगराध्यक्षपदासाठी १५ हून अधिक इच्छुक
बीड (प्रतिनिधी)दि.५ : आगामी बीड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने डॉ.योगेश क्षीरसागर यांनी नगराध्यक्ष, नगरसेवकपदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांकडून अर्ज मागविले होते. डॉ. क्षीरसागर यांच्या आवाहनानंतर बीड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकाच दिवसात दीडशेहून अधिक अर्ज पक्षाकडे दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी कार्यकर्ते व इच्छुकांना नाममात्र शुल्क भरून अर्ज फॉर्म घेऊन जमा करण्याचे आवाहन केले होते. आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत दीडशेहून अधिक इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी १५ हून अधिक इच्छुकांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज केले आहेत. या अर्ज प्रक्रियेद्वारे बीड शहरातील कार्यकर्त्यांसह नागरिकांचा कल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असल्याचे स्पष्ट होत आहे.
चौकट
डॉ.योगेश क्षीरसागर यांचे संघटन मजबूत
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.योगेश क्षीरसागर यांनी बीड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत केलेले आहे. तसेच, इच्छुकांच्या अर्ज संख्येवरून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
Back to top button