बीड
विजय सोनवणेच्या ॲट्रॉसिटी व अपहरण प्रकरणातील आरोपी नेकनूर पोलिसांच्या आशीर्वादाने मोकाट

विजय सोनवणेच्या ॲट्रॉसिटी व अपहरण प्रकरणातील आरोपी नेकनूर पोलिसांच्या आशीर्वादाने मोकाट
बीड प्रतिनिधी – नेकनूर पोलीस स्टेशन अंतर्गत विजय सोनवणे यांच्यावर बारा दिवसापूर्वी पाठीमागून येऊन साखळी त्याचा वापर करत गंभीर जखमी केले होते. व जाती वाचक शिवागाव अपर्णाची धमकी देण्यात आली होती. ॲट्रॉसिटी व अपहरण अंतर्गत गुन्हा दाखल झाला व अमाणूस पणे मारहाण करणा-या आरोपी तेजस अशोक मांडवे,आदित्य अशोक मांडवे यांना तात्काळ अटक अटक करून कायद्याचा वचक बसवावा.
आरोपी हे राहणार मसेवाडी ता. जि. बीड याठिकाणी स्वतःचे ट्रॅक्टर घेऊन गावात गुंडपणा करतात राजकीय दबाव टाकतात तसेच जेष्ठ व्यक्ती तसेच अन्य लोकांना अरेरावीची भाषा वापरतात. मागील दि. 16/07/2025 रोजी त्यांनी गावातीलच विजय सोनवणे या रिक्षाचालक युवकाण बेसावध असताना लोखंडी चैनने डोक्यात मारुन टाकण्याच्या विचाराने मारहान केली तसेच त्यास जातीवाचक शिवीगाळ केली त्याच्या आईस व पत्नीस धमकी दिली आणि हे सर्व करुनही नेकनूर पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. आणि ते आरोपी गावात मोकाट फिरत आहेत, काही आरोपी सोनवणे जीवे मारण्याचा धमक्या देत आहेत.घटनेची सत्यता तपासुन तसेच गांभीर्य लक्षात घेऊन यावर लक्ष द्यावे. अशी मागणी पोलीस अधीक्षक नवनीत त्यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
चौकट
नेकनूर पोलीस योग्य तपास करत नसल्याने समाजसेविका आम्रपाली साबळे व सोनवणे यांच्या कुटुंबीयांनी बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु भेट झाली नाही लवकरच भेट घेणार असले चे सांगितले आहे. सोनवणे कुटुंबात झालेल्या अन्याय अत्याचार मानवतेला काळीमा फासणार आहे. त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत असे आम्रपाली साबळे यांनी सांगितले आहे.


