📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

राष्ट्रीय आरोग्य अभियान आंदोलकाचा प्रश्न तात्काळ सोडवा नसता आम्ही रस्त्यावर उतरू  प्रा. सुशीलाताई मोराळे

राष्ट्रीय आरोग्य अभियान आंदोलकाचा प्रश्न तात्काळ सोडवा नसता आम्ही रस्त्यावर उतरू  प्रा. सुशीलाताई मोराळे
बीड प्रतिनिधी: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांचे 14 मार्च 2024 चे शासन निर्णयानुसार शासन सेवेत कायम समायोजन करण्यात यावे या मागणीसाठी हे कर्मचारी 19 ऑगस्ट 2025 पासून संपावर गेले आहेत. त्यांची ही मागणी योग्य असून सरकारने या कर्मचाऱ्यांना वेठीस न धरता तात्काळ त्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी आरोग्य मंत्री आबिटकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी केली आहे.
दिनांक 29 ऑगस्ट रोजी आंदोलकांना भेटल्यानंतर त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. सरकार कंत्राटी कर्मचाऱ्याकडून पूर्ण वेळ काम करून घेत आहे मात्र त्या प्रमाणात मोबदला किंवा सेवा संरक्षण देण्यास तयार नाही. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी परिचारिका संपावर गेल्यामुळे शासकीय दवाखान्यातील आरोग्य सेवावर विपरीत परिणाम होत आहे, विशेषता डायलिसिस विभागातील पेशंटवर मृत्यूची वेळ आली आहे. अपुऱ्या स्टाफ मुळे आहे त्या परिचारिका वर प्रचंड ताण पडत आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या नियमित कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त आहे. बालविभागात सर्वात जास्त फटका या संपाचा बसत आहे. महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक अहवाल जानेवारी 2025 मध्ये १ लाख कंत्राटी बेरोजगारांनी नोकरीसाठी नोंदणी केली 2024 मध्ये ही नोंदणी १० लाख 21 हजार होती एका वर्षात सातपट वाढ झाली. 2024 मध्ये नोंदणी केलेल्या दहा लाख 21 हजार पैकी फक्त दोन लाख 27 हजार बेरोजगारांना रोजगार मिळाला प्रत्यक्ष नोंदणी व नोकरीत मोठी तफावत आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा सर्व भार कंत्राटीच्या जीवावर आहे हे अभियान सुरू होऊन 25 वर्ष लोटली आहेत सरकार आज ना उद्या दया दाखवील या आशेवर हे कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत सरकारने त्यांचा संप तात्काळ मिटवून त्यांना दिलासा द्यावा नसता आम्हा नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी दिला आहे.
Back to top button