संपादकीय

धानोरा रोड मुख्य रस्ता व चर्‍हाटा रोड नवीन करण्यासंदर्भात नगरसेवकांचे अजित पवार यांना लेखी निवेदन..

धानोरा रोड मुख्य रस्ता व चर्‍हाटा रोड नवीन करण्यासंदर्भात नगरसेवकांचे अजित पवार यांना लेखी निवेदन..
बीड(प्रतिनिधी)- प्रभाग क्रमांक 24 मधील धानोरा रोड मुख्य रस्ता व अंकुश नगर येथील मुख्य रस्ता यासंदर्भात राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत योगेश क्षीरसागर यांच्या मार्फत पालकमंत्री अजित पवार यांना आज नगरसेवक रंजित बनसोडे आणि भैय्यासाहेब मोरे यांनी लेखी निवेदन दिले व या रस्त्याची परिस्थिती सांगितली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील मुख्य रस्ता असलेल्या धानोरा रोड आणि चर्‍हाटा रोड या रस्त्यांना अनेक अडचणी येत असून नागरिकांना, महिलांना,विद्यार्थ्यांना सतत याचा त्रास होत असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून सतत अपघात होत आहेत, व रस्त्यांवर प्रचंड धूळ झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात जात आहे या रस्त्याच्या कामासंदर्भात यापूर्वी अनेक उपोषणे आंदोलने रस्ता रोको झालेले आहेत पण अद्याप पर्यंत प्रशासनाने याची कसलीही दखल घेतलेली नाही, या रस्त्याचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने मार्गी लागत नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी म्हटले होते, रोज हजारो लोक या रस्त्यावरून जातात येतात, याच काय काहीतरी उपाययोजना करून नागरिकांना जाण्यासाठी रस्ता करण्यात यावा या रस्त्यावर मोठी बाजारपेठ आहे,दवाखाने क्लासेस, शाळा, व्यापारी, रिक्षा स्टॉप, मंगल कार्यालय, व अनेक ग्रामीण भागांना जोडले जाणारे हे दोन रस्ते आहेत तरी हे रस्ते होणे अत्यंत गरजेचे आहे,अशी मागणी नगरसेवकांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली यावेळी डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या समवेत नगरसेवक भैय्यासाहेब मोरे,नगरसेवक रंजीत बनसोडे, रमेश शिंदे सह निवेदन देताना उपस्थित होते, यानंतर नगरसेवकांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला
Back to top button