बीड
जामखेड शहरातील तपनेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्र निमित्त शिवलिलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन

जामखेड शहरातील तपनेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्र निमित्त शिवलिलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन
जामखेड प्रतिनिधी दि.२४;-शहरातील विंचारणा नदी काठी वसलेले मूळ तपनेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्र निमित्त दि.२४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत तीन दिवसीय शिवलिलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.याची सांगता दि.२६ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे.या शिवलिलामृत पारायण सोहळ्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.असे आवाहन तपनेश्वर महादेव मंदिर सेवा समितीने केले.
तपनेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यात हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात.महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर तपनेश्वर महादेव मंदिर सेवा समितीने मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केली असून मंदिराचे गर्भगृह, सभामंडप इत्यादी ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे.



