बीड
लिंबागणेश येथे रास्ता रोको ; मनोजदादा जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा आंदोलनाची धग वाढली:-डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश येथे रास्ता रोको ; मनोजदादा जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा आंदोलनाची धग वाढली:-डॉ.गणेश ढवळे
—-
लिंबागणेश :-(दि.०१)सरकार मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करत नसल्याने मनोजदादा जरांगे पाटलांनी आजपासून पाणी त्याग करून कडक उपोषणाला सुरुवात केली. त्यामुळे आंदोलनाची धग अधिक वाढली आहे.
त्याच धर्तीवर बीड तालुक्यातील अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग (क्र. ५४८ डी) वरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान, लिंबागणेश येथे मराठा सेवक डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१ सोमवार रोजी सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. बहुजन समाजातील बांधवांनी जरांगे पाटलांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शविला व मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली.
निवेदन नेकनुर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पद्माकर आहेर,सपो.लक्ष्मण बीडकर, बाबासाहेब राख, गोविंद बडे पोह.प्रशांत क्षीरसागर, सतिश राऊत, अविनाश घुंगरट, विशाल क्षीरसागर, बाळासाहेब ढाकणे, विशाल कदम,महसूल प्रशासनाचे मंडळ अधिकारी महादेव जायभाये, तलाठी गणपत पोतदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक बीड यांना देण्यात आले. यावेळी मुळकुवाडीचे सरपंच रामकिसन कदम, धनगर समाजाचे नेते कृष्णा पितळे आदींची भाषणे झाली.आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.मात्र यावेळी रूग्णवाहिकेला मोकळी वाट करून देण्यात आली. यावेळी आंदोलनात लिंबागणेश पंचक्रोशीतील सकळ मराठा समाजा बरोबरच गावगाड्यातील
बहुजण समाजातील बांधवांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, पिंपरनईचे सरपंच बाळासाहेब वायभट, पोखरीघाटचे सरपंच बाबासाहेब मुळीक, अंजनवतीचे सरपंच सुनिल येडे, मेंगडेवाडीचे ज्ञानेश्वर मेंगडे, प्रशांत कदम, राजेभाऊ गिरे, कल्याण वाणी, औदुंबर नाईकवाडे, सुंदरराव जाधव, पांडुरंग वाणी, गणपत तागड,समीर शेख,अशोक वाणी,अक्षय येडे ,संजय घोलप,अजय थोरात,आदी सहभागी होते
—
“सरसकट” शब्द वगळूनही जरांगे पाटलांची लवचिकता – आता सरकारने सहनशक्तीचा अंत पाहू नये : डॉ.गणेश ढवळे
—
सरकारने न्यायालयाचा हवाला देत मराठा समाजाला “सरसकट” ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. यावर तोडगा म्हणून जरांगे पाटलांनी “सरसकट” हा शब्द वगळत, ५८ लाख कुणबी नोंदींच्या आधारे मराठा व कुणबी एकच असल्याने तातडीने अध्यादेश काढावा, असा पर्याय दिला आहे.
“सरकारकडे आता कोणतेही कारण शिल्लक नाही. गरजवंत मराठ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये, तातडीने आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा,” अशी मागणी डॉ.गणेश ढवळे यांनी केली.
—
मुंबईतील आंदोलनकर्त्यांची उपासमार – अमानवीय कृत्याचा सर्वत्र निषेध
—-
मुंबईतील आझाद मैदानावर जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ जमलेल्या कार्यकर्त्यांसाठी हॉटेल व दुकाने बंद ठेवून अन्नपुरवठा बंद करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला. हा अमानवीय व संवेदनाहीन प्रयत्न असल्याचे सांगून सर्वांनी याचा तीव्र निषेध केला.
“मुंबईतील बांधवांना सर्वोतोपरी मदत पाठवली जाईल,” असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला.



