राजकीय

.तर आम्ही डोळे फोडून टाकू, हात कापून टाकू” भाजपा खासदाराची काँग्रेसला धमकी

 

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री सतत वादग्रस्त विधाने करून स्वतःचा आणि पक्षाच्या अधचणीत वाढ करताना अनेकदा दिसून आले आहेत त्यातच आता भाजपा खासदार अरविंद शर्मा यांनी वादग्रस्त विधान करून नवा वाढ अंगावर ओढवून घेतला आहे. जर कोणीही हरियाणाचे माजी मंत्री मनीष ग्रोवर यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे डोळे फोडून टाकू, हात कापून टाकू अशी धमकी भाजपाचे अरविंद शर्मा यांनी शनिवारी दिली.

भाजपाने रोहतकमध्ये काँग्रेसविरोधात आंदोलन केले. शेतकरी आणि गावकऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे मनीष ग्रोवर आणि इतर अनेक भाजपा नेते शुक्रवारी हरियाणाच्या रोहतकमधील एका मंदिराच्या संकुलात काही तास बंदिस्त होते. अरविंद शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यांच्या या विदेवर आता उलटसुलट प्रतिक्रिया येणे सुरु झाले आहे.

अरविंद शर्मा यांनी रोहतक येथील एका मंदिरात मनीष ग्रोवरसह भाजपाच्या काही नेत्यांना ओलीस ठेवण्यात आल्यानंतर धमकावलं आहे. या घटनेला त्यांनी काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. “जर मनीष ग्रोवरकडे कोणी डोळे वर करून पाहिलं तर डोळे काढून टाकले जातील आणि जर कोणी हात उचलला तर तो हात आम्ही कापून टाकू, आम्ही कुणालाही सोडणार नाही” असं वादग्रस्त विधान केलं आहे. या घटनेने राजकारण तापलं असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

Back to top button