बीड

गेवराई च्या सर्वांगीण विकासासाठी नगर परिषद मध्ये राष्ट्रवादी ची सत्ता द्या.-अजित पवार 

गेवराई च्या सर्वांगीण विकासासाठी नगर परिषद मध्ये राष्ट्रवादी ची सत्ता द्या.-अजित पवार 

अल्पसंख्याक समाजाला उपनगराध्यक्ष पद देणार.
=========
रेकाॅर्ड ब्रेक सभेने राष्ट्रवादी च्या विजयावर शिक्कामोर्तब.
==========
गेवराई दि. २९ (प्रतिनिधी) तुम्ही माझ्या शब्दावर विजयसिंह पंडित यांना भरघोस मतांनी निवडून दिले. मागील ११ महिन्यामध्ये विजयसिंह पंडित यांनी दमदार कामगिरी केली आहे. तसीच कामगिरी शहराच्या विकासासाठी करण्यासाठी नगर परिषद मध्ये राष्ट्रवादी ला सत्ता द्या. गेवराई शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकू अशी प्रतिपादन अजित पवार यांनी केले ते गेवराई नगर परिषद मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष सौ शितलताई महेश दाभाडे व नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये बोलत होते.
गेवराई नगरपरिषद निवडणुकी मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्षा व नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ना. अजित पवार यांच्या सभेचे येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना ते म्हणाले की, अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली इथे चांगले काम चालू आहेत. माझ्या शब्दावर विश्वास ठेवून तुम्ही विजयसिंह पंडित यांना निवडून दिल्यामुळे मला त्यांना निधी देता आला. मागील ११ महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे करण्यात आली आहेत. अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित हे विकासाचा दृष्टिकोन असणारे नेतृत्व आहे. विकासासाठी त्यांची धडपड आहे. ते विकास कामासाठी सतत माझ्याकडे पाठपुरावा करत असतात. मागील ११ महिन्यांमध्ये शादीखाना, मंगल कार्यालय, रस्ते-नाल्या, पी टी आर चे वाटप इत्यादी कामे करण्यात आलेले आहेत. विजयसिंह पंडित यांनी अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या भविष्यकालीन विकासासाठी विकास आराखडा तयार केलेला आहे. त्यामध्ये दोन्ही बायपास रोड रुंदीकरण, नवीन पाणीपुरवठा, योजना भूमीबंद सांडपाणी व्यवस्था इ. कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
आपण देशात व राज्यात सत्तेमध्ये आहोत. मी पालकमंत्री आहे. विजयसिंह पंडित हे विधिमंडळ सदस्य आहेत. त्यामुळे आपल्याला कुठल्याही कामाला निधी कमी पडणार नाही. शासनाच्या योग्य वेगवेगळ्या योजना आपण शहरांमध्ये राबवू शकतो.
पक्षाने दिलेले सर्व उमेदवार हे होतकरू व सुसंस्कृत आहेत. काही अनुभवी व काही नव्या दमाचे उमेदवार देऊन सर्व समतोल राखला गेला आहे. त्यामुळे या सर्वांना येत्या २ तारखेला घड्याळावर मतदान करून सौ. शितलताई महेश दाभाडे व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे. असे आव्हान त्यांनी केले.
आमदार विजयसिंह पंडित म्हणाले की, दादांच्या रुपाने राज्याच्या तिजोरीची चावी आपल्या हातामध्ये आहे. म्हणूनच मागील १२ महिन्यांमध्ये ३५ कोटीची विकास कामे आपण करू शकलो. दादा हे शब्दाला जागणारी आहेत. तुम्ही सौ शितलताई महेश दाभाडे व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावेत. मी व साहेब संपूर्ण गेवराई शहराचा विकास केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत असे प्रतिपादन केले.
यावेळी दादासाहेब चौधरी, एस.वाय.अन्सारी, आरपीआयचे अध्यक्ष किशोर कांडेकर, कालिदास नवले, सौ. सिमाताई अमोल होंडे, सुभाष महाराज नागरे महेश अण्णा दाभाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर मा. आ. संजय दौंड, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे कल्याणराव आखाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रा. सुनील मगरे यांच्यासह सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. या सभेस शहरातील तरुण व महिला मतदार प्रचंड संख्येने उपस्थित होते.
Back to top button