बीड

बीड जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीचा सहभाग शाळा बंदचे आवाहन

बीड जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीचा सहभाग शाळा बंदचे आवाहन
बीड : शिक्षक-शिक्षकेत्तर संघटना समन्वय समितीद्वारा जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवार ५ डिसेंबरला महामोर्चा काढण्यात येणार आहे.या महामोर्चात बीड जिल्हातील शाळा बंद ठेवून सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ,जुनी पेन्शन संघटना,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना,शिक्षक परिषद,संयुक्त मुख्याध्यापक
महामंडळ, मुख्याध्यापक महामंडळ,शिक्षक लोकशाही आघाडी यांनी केले आहे.या आंदोलनाला शिक्षक सेना,शिक्षक भारती,अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना,शिक्षक लोकशाही आघाडी,केंद्रप्रमुख संघ महाराष्ट्र,माध्य व उच्च माध्य शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ,माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटना महामंडळ,अपंग शिक्षक संघटनासह इतर संघटनांनी पाठींबा दिला असून या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
तसेच प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे,राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी महाराष्ट्रातील ३० शिक्षक संघटना यांना पत्र देऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
टीईटी अनिवार्यतेच्या नावाखाली थांबविलेल्या पदोन्नती प्रक्रिया शीघ्र सुरु व्हावी,म.ना.से.नियम १९८२व १९८४ अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्ववत बहाल करावी,संचमान्यता शासन निर्णय तसेच कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद (समायोजित)करण्याचे धोरण रद्द करून बालकांच्या शिक्षणाची
हेळसांड थांबवावी,५ डिसेंबर पर्यंत अतिरीक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया ही अव्यवहार्य व गुणवत्तापूर्ण शिक्षणास अडसर असणारी आहे.ती रद्द करण्यात यावी,शिक्षणसेवक योजना बंद करून पूर्ण वेतनावर नियमित शिक्षक भरती पूर्वलक्षी प्रभावाने सुरु करावी,सर्व विषय पदवीधर शिक्षकांना भेदभाव न करता पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी,राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बंद असलेली पदभरती तत्काळ सुरु करावी,याकरिता राज्यभर आंदोलन होणार आहे.
या महामोर्चात शाळा बंद ठेवून सर्व शिक्षकांनी ताकतीने सहभागी होण्याचे आवाहन बीड जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य संघटक राजेंद्र खेडकर,विभाग मार्गदर्शक दिलीप खाडे,बीड जिल्हाध्यक्ष महेश सातपुते,सरचिटणीस सुरेंद्र गोल्हार,कार्याध्यक्ष लहू पवार,कोषाध्यक्ष विष्णू झोंबाडे,उपाध्यक्ष मधुकर सानप,प्रसिद्धीप्रमुख योगेश सोळसे,शिक्षक नेते शेख वजीर,अशोक धोंडे,सल्लागार एस के सानप,जी.डी मिसाळ,सर्व तालुकाध्यक्ष कैलास शेकडे, भाऊसाहेब बांगर,अनंत सानप,राजू जाधव,विशाल कुलकर्णी, केशव बादाडे,सुंदर डोंगरे,राहुल काकनाळे,बापूराव फड,रत्नाकर फड,अर्जुन मुंडे.या शिक्षक समिती पदाधिकाऱ्यांनी सर्व शिक्षकांना या महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Back to top button