बीड
समता क्रांती मार्च रॅलीच्या पूर्वतयारीसाठी रिपाइंच्या जिल्हास्तरीय बैठका आयोजित: विष्णू जोगदंड

समता क्रांती मार्च रॅलीच्या पूर्वतयारीसाठी रिपाइंच्या जिल्हास्तरीय बैठका आयोजित: विष्णू जोगदंड
बीड/ प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला ७५ वर्ष पूर्ण होत असल्यामुळे व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 200 वी जयंतीचे औचित्य साधून या देशात समता नांदावी ही भूमिका घेऊन रिपाइंच्या वतीने राज्यभर समता क्रांती मार्च रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. समता क्रांती मार्च रॅलीच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि. 16 ऑक्टोबर 2026 रोजी बीड शहरात समता क्रांती मार्च रॅली आयोजित करण्यात आली आहे. समता क्रांती मार्च रॅलीच्या पूर्वतयारीसाठी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या प्रमुख उपस्थितीत खालील प्रमाणे रिपाइंच्या जिल्हास्तरीय बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.
शुक्रवार दि. 18 सप्टेंबर 2026 रोजी शिरूर कासार- सकाळी ठीक 11 वाजता, आष्टी-दुपारी ठीक 2 वाजता शनिवार दि.19 सप्टेंबर 2026 रोजी गेवराई-सकाळी ठीक 11 वाजता, रविवार दि. 20 सप्टेंबर 2026 रोजी केज-सकाळी ठीक 11 वाजता, अंबाजोगाई- दुपारी ठीक 1 वाजता, परळी दुपारी ठीक 4 वाजता, सोमवार दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी माजलगाव- सकाळी ठीक 11 वाजता, धारूर- दुपारी ठीक 1 वाजता, वडवणी- दुपारी ठीक 4 वाजता अशी माहिती रिपाइंचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख विष्णू जोगदंड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.



