संपादकीय

“हॉस्पिटल कचरा प्रकरणात निवडक कारवाई – लेडाळ हॉस्पिटलला मोकळीक?”

“हॉस्पिटल कचरा प्रकरणात निवडक कारवाई – लेडाळ हॉस्पिटलला मोकळीक?”

“प्रशासनाचे डोळे झाक – एका हॉस्पिटलवर कारवाई, शेजारील हॉस्पिटलला सोडचिठ्ठी!”

माजलगाव | सुहास सावंत

राज्यातील प्रशासन, शासन आणि लेखणी हे तिन्ही स्तंभ आज विक्रयास लागल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील गंभीर प्रश्नांवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई व्हायला हवी होती; पण नगरपरिषद फक्त निवडक कारवाई करून उरकून घेत असल्याचे समोर आले आहे.
माजलगावातील हॉस्पिटल कचरा प्रकरणात स्थानिक माध्यमांनी मुद्दा उचलून धरला. राज्यभर चर्चा रंगली, नागरिक संतापले. अखेर नगरपरिषदेने एक हॉस्पिटलवर नोटीस काढली; मात्र अगदी शेजारील लेडाळ हॉस्पिटलवर कोणतीही कारवाई झालेली नाही. एवढेच नव्हे तर लेडाळ हॉस्पिटलकडून कुठलाही खुलासा मागितला गेला नाही, हा प्रकार उघडपणे पक्षपाती व संशयास्पद ठरत आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, “कचऱ्याचा गंभीर प्रश्न असताना केवळ एका हॉस्पिटलला जबाबदार धरणे आणि शेजारील हॉस्पिटलला सोडचिठ्ठी देणे म्हणजे प्रशासन भ्रष्टाचार लपवतेय का?” यामुळे सामान्य माणसात तीव्र रोष आहे.
यावरून जनतेचा थेट सवाल – “लेखणी, प्रशासन व शासन जर विकायला लागले तर महाराष्ट्र हुकूमशाहीकडे चालला आहे की काय?” माध्यमे सतत आवाज उठवत आहेत, पण अधिकाऱ्यांना व सत्ताधाऱ्यांना ‘केराच्या टोपली’ शिवाय काही समजत नाही, अशी बोचरी टीका जनतेतून होत आहे.
पत्रकारांच्या लेखणीला बोथट करण्याचे प्रयत्न, दबाव व धमक्या सुरू असताना, आता निवडक कारवाई करून नागरिकांचा विश्वासच संपुष्टात आणला जात आहे. भ्रष्टाचार व कचरा प्रकरणावरून फक्त पत्रव्यवहारापुरती कारवाई हा लोकशाहीसाठी धोक्याचा इशारा आहे, असे स्पष्टपणे नागरिक सांगत आहेत.
लोकशाही टिकवायची असेल तर निवडक नव्हे, तर सर्व संबंधित हॉस्पिटलवर समान व कठोर कारवाई व्हावी, हीच जनतेची मागणी आहे.

Back to top button