📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

शेवगाव मध्ये खरिपाचे नियोजन बिघडले ! शेतकऱ्याला मनपसंत बियाणे मिळेना … अधिकाऱ्यांची

शेवगाव मध्ये खरिपाचे नियोजन बिघडले !
शेतकऱ्याला मनपसंत बियाणे मिळेना …
अधिकाऱ्यांची

अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या बैठकांचा फक्त फार्स ठरला गेला !

अहिल्यानगर:-शेवगाव तालुक्यामध्ये खरिप हंगामाचे नियोजन बिघडलेले असल्याचे चित्र सध्या तालुक्यात सध्या दिसत आहे, यावर्षी मे महिन्यातच समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची बी बियाणे रासायनिक खते खरेदीसाठी लगबग सुरू केली आहे आहे, परंतु शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बियाणे मात्र बाजारामध्ये चढ्या दराने विकले जात असल्याचे दिसत आहे. बाॅउस्नर, ७३५१ गोल्ड, या महिको कंपनीच्या कापसाच्या बियाणाचा तुडवडा मोठ्या प्रमाणात चालू आहे, हे दोन वाण खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्राचेदारे झिजताना दिसत आहे. मात्र महिको कंपनीच्या कपाशीच्या बियाणाबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता येत नाही, संबंधित अधिकारी याबाबत कानावर हात ठेवून आहेत, अधिकाऱ्यांकडेही याबाबत समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत, एकंदरीतच तालुक्यातील खरीप हंगामाचे नियोजन बिघडल्याचे दिसत दिसत आहे, गेल्या दोन महिन्यांपासून खरीप हंगामा बाबत अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये होत असलेल्या बैठका या नुसत्या फार्स होत्या का ? असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहेत बियाणे पुरवठा बाबत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडून उडवा उडविचे वेगवेगळी उतरे मिळत आहे! त्यामुळे बाजार पेठेत मात्र चढ्या दराने बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी शेतकरी वर्गातून जोरदार मागणी होत आहे. व्यापारी अधिकारी यांच्या संगनमताने बाजारात कपाशी बियाणे जादा दराने काळ्या बाजारात विक्री केली जात आहे
मोठे रॉकेट कार्यरत आहे त्याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी अजिनाथ मासाळकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे
———-
चौकट
बियाणे बाबत सदर महिको कंपनीचे परिक्षेत्र अधिकारी यांना विचारले असता त्यांनी आपणास याबाबत काहीही माहिती नाही असे सांगितले, बियाणांचा तुटवडा कसा तयार झाला याबाबत तुम्ही वरिष्ठांना विचारा असे
विकास खरले
महिको कंपनी परिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले.
चौकट
अपडेट देतो,
तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले यांना बियाणे टंचाईच्या संदर्भात माहिती विचारले असता तुम्हाला मी अपडेट देतो असे सांगितले परंतु २४ तासाच्या नंतरही त्यांनी कुठलेही प्रकारचे माहिती दिली नाही.
अंकुश टकले , तालुका कृषी अधिकारी

चौकट
पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल कदम यांना या संदर्भात विचारले असता त्यांनीही अपडेट देतो असे सांगितले व त्यांनीही अपडेट दिले नाही.
राहुल कदम, तालुका कृषी अधिकारी
पंचायत समिती शेवगाव,

चौकट
जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी एकाच वाणाची मागणी करू नये, शेतकऱ्यांनी इतरही कपाशीचे वाण विकत घ्यायला हरकत नाही. शेतकऱ्यांकडून एकच कंपनीच्या बियाणाची मागणी आल्यामुळे बाजारामध्ये बियाणाची टंचाई निर्माण झाली आहे.

सुधाकर बोराळे,
जिल्हा कृषी अधिकारी, अहिल्यानगर

चौकट
मला शेवगाव शहरामध्ये एका खाजगी व्यक्तीकडून चौदाशे रुपयांनी महिको कंपनीच्या बाउंन्सर या कपाशीच्या बियाणाची बॅग मिळाली. यासाठी मला शेवगाव शहराच्या बाजारपेठेमध्ये थोडा वळ प्रतीक्षा करावी लागेली, त्यानंतर एका कृषी केंद्र चालकाच्या पंटरने मला चौदाशे रुपयांमध्ये बिगर पावतीची ही बॅग दिली. हे त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

एक शेतकरी,
———

Back to top button