📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी नाही – बापूसाहेब तारूकर 

गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी नाही – बापूसाहेब तारूकर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक गेवराई या शाळेतील विद्यार्थ्यांनी मंथन पब्लिकेशन द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शाळेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बापूसाहेब तारूकर यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक करताना गुणवत्ता ही केवळ एखाद्या शाळेची, ठराविक विद्यार्थ्यांचीच मक्तेदारी नसून ज्या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी परिश्रमपूर्वक परीक्षेची तयारी करतात तेच अशा परीक्षेमध्ये यशस्वी होतात. कोणत्याही कार्यात यशस्वी व्हायचे असेल तर परिश्रमाला पर्याय नाही आणि जो परिश्रम करतो त्याला यश हमखास मिळते याचीच प्रचिती माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आम्हा सर्वांना दिली याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी नियोजनबद्ध विद्यार्थ्यांचा करून घेतलेला अभ्यास याचा परिपाक आहे. अशी प्रतिपादन केले.
     या परीक्षेसाठी शाळेतील प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी दहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
यामध्ये इयत्ता तिसरी मध्ये शिकणारी शाळेची विद्यार्थिनी शुभ्रा अंकुश आतकरे हिने तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तसेच इयत्ता पहिलीतून ज्ञानेश्वरी बळीराम सोनवणे हिने तालुक्यातून दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे, इयत्ता चौथीच्या वर्गातील अमृता अमोल आतकरे हिने तालुक्यातून दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. इयत्ता दुसरीचा विद्यार्थी श्रीकांत अमोल आतकरे व इयत्ता तिसरीची ज्ञानेश्वरी सचिन कवडे हे दोन्ही विद्यार्थी तालुक्यातून चौथा क्रमांक मिळवून गुणवत्ता यादीत झळकले आहेत या सोबतच पुनम विलास उदावंत ही इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी तालुक्यातून सातवा क्रमांक मिळवून गुणवत्ता यादीत आली आहे.
आज शाळेच्या वतीने या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा व या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका वैशाली वाघमारे, पार्वती मारकवाड आणि माधुरी देशपांडे या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
  या सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे गटशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण काळम पाटील, महादेव साबळे, केंद्रप्रमुख संजय मोरे, केंद्रीय मुख्याध्यापक भागवत सोनवणे व केंद्रातील सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.
Back to top button