📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

प्रा. प्रल्हाद बालासाहेब काकडे सेट परीक्षा उत्तीर्ण

प्रा. प्रल्हाद बालासाहेब काकडे सेट परीक्षा उत्तीर्ण
अंबाजोगाई प्रतिनिधी, – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (सेट जून 2025)मध्ये समाजशास्त्र या विषयात प्रा.प्रल्हाद बालासाहेब काकडे यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ते स्वतः दिव्यांग असून त्यांनी आपल्या व्यंगावर मात करत सलग दोन विषयात सेट परीक्षा पास केली आहे या अगोदर ( सेट मार्च 2023 )मध्ये ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयात सेट उत्तीर्ण असूनही जिद्द ठेवून परत दुसऱ्यांदा ही किमया केली आहे आपल्या दिव्यांग पणाचे भांडवलं न करता ते कष्ट हेच भांडवल हे ब्रीद मनाशी धरून सतत कार्यरत असतात ते निवासी मुलांचं वसतिगृह चालवीतात व राजर्षी शाहू अध्यापक महाविद्यालयात ग्रंथापाल पदावर कार्यरत आहेत दोन वेळा ही परीक्षा पास केल्या मुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक करण्यात येत आहे.
Back to top button