तेजस्विनी देवकाते यांची कृषि सहाय्यक अधिकारी पदावर नियुक्ती; स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्रात सत्कार

तेजस्विनी देवकाते यांची कृषि सहाय्यक अधिकारी पदावर नियुक्ती; स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्रात सत्कार
जामखेड – तेजस्विनी देवकाते यांची कृषि सहाय्यक अधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र, जामखेड यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. उपक्रमशील शिक्षक बी.एस. शिंदे यांच्या हस्ते हा सत्कार पार पडला.
कार्यक्रमात बोलताना देवकाते यांनी स्पर्धा परीक्षा तयारीतील सातत्याचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “अपयशाने खचून न जाता प्रयत्न सुरू ठेवणे गरजेचे आहे. आपण घेतलेल्या निर्णयात यश मिळवण्याची जिद्द हवी.”
या वेळी शिंदे सरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभ्यासातील चिकाटी, योग्य दिशा आणि नियमित परिश्रम यावर भर दिला.
स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा – शांत अभ्यासिकेचे वातावरण, दर्जेदार वाचनसामग्री, मार्गदर्शन वर्ग – याबाबत विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाला एन.सी.सी. ऑफिसर मयूर भोसले, अभ्यासिकेचे विद्यार्थी आणि मार्गदर्शक उपस्थित होते. संचालिका प्रियांका शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन प्रतीक्षा खाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आजिनाथ हळनोर यांनी केले.



