प्रभाग सातच्या नगरसेविका नंदा होळकर यांचा हळदी-कुंकू समारंभ उत्साहात संपन्न

प्रभाग सातच्या नगरसेविका नंदा होळकर यांचा हळदी-कुंकू समारंभ उत्साहात संपन्न
लाडक्या बहिणींची मोठी गर्दी;टिफिन बॉक्सचे वाटप
जामखेड (प्रतिनिधी) : जामखेड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ च्या नगरसेविका नंदाताई प्रविण होळकर यांच्या वतीने शनिवार दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी त्यांच्या निवासस्थानी तपनेश्वर येथे स्वराज नगर,जामखेड या ठिकाणी तिळगुळ व हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
मकरसंक्रांत निमित्त महिलांकरिता आयोजित करण्यात आलेल्या सर्वांगसुंदर कार्यक्रमाला लाडक्या बहिणींची अलोट गर्दी पहावयास मिळाली.
या कार्यक्रमासाठी जामखेड नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी,खर्डा ग्रामपंचायत सरपंच संजीवनी पाटील, महिला शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणी काशिद,माजी नगरसेविका राजश्री पवार,नगरसेविका सिमा कुलकर्णी,जया गव्हाळे, आशाबाई टकले,वैशाली म्हेत्रे, सुमन शेळके,दिपाली गर्जे तसेच सविता सानप,वर्षा डोके,नंदा गोरे,रुपाली डोंगरे,मिरा तंठक,वर्षा जावळे लक्ष्मी पवार यांसह शैक्षणिक,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील महिला भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.सदर कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या मान्यवर व्यक्तीचा यथोचित सन्मान प्रभाग सातच्या नगरसेविका नंदा प्रविण होळकर यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी व सरपंच संजीवनी पाटील यांनी आपल्या मनोगतातून सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल नंदाताई प्रविण होळकर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व महिला भगिनी, विविध मान्यवर व्यक्ती यांचे आभार नगरसेविका नंदाताई प्रविण होळकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.तसेच मकरसंक्रांती निमित्त सर्व महिला भगिनी यांना शुभेच्छा दिल्या.
विठ्ठल रुक्मिणी सुंदर मूर्ती ,सेल्फी पॉईंट,सुंदर डेकोरेशन, आकर्षक रोषणाई, मान्यवर व्यक्ती सत्कार समारंभ, महिलांचा उदंड प्रतिसाद, स्वादिष्ट व रुचकर नाष्टा या सर्व बाबी सदर कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणबिंदू ठरल्या. संक्रांत वाण म्हणून उपस्थित सर्व महिला भगिनी यांना इन्सुलेटेड ऍडजस्टेबल टिफिन बॉक्सचे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजपा शहर मंडल उपाध्यक्ष प्रविण होळकर,प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व प्रभाग सात मधील सर्व लाडक्या बहिणी यांनी विशेष परिश्रम घेतले.



