📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

सभापती मोहन पवार व राजश्रीताई पवार यांच्या वतीने महिलांचा सन्मान; हळदी-कुंकू कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद

सभापती मोहन पवार व राजश्रीताई पवार यांच्या वतीने महिलांचा सन्मान; हळदी-कुंकू कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद

सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी निवडीबद्दल मोहन पवार यांचा सत्कार

जामखेड प्रतिनिधी :

नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे जामखेड नगर परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती मोहन पवार व त्यांच्या सौभाग्यवती माजी नगरसेविका राजश्रीताई पवार यांच्या वतीने प्रभागातील महिलांसाठी मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रम यावर्षीही मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
हा कार्यक्रम गुरुवार दि. २३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जामखेड शहरातील श्री नागेश विद्यालयाच्या पाठीमागे, संतोषीमाता मंदिराजवळील मैदानात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सुनिता मधुकर (आबा) राळेभात, नगराध्यक्ष प्रांजल अमित चिंतामणी, ग्रामीण विकास केंद्राच्या संचालिका उमा अरुण जाधव उपस्थित होत्या. यावेळी नगरसेविका नंदा प्रवीण होळकर, जया संतोष गव्हाळे, वैशाली अर्जुन म्हेत्रे, सुमन अशोक शेळके, संगिता रामचंद्र भालेराव,उषा शेळके,सुरेखा सदाफुले, विजयालक्ष्मी जाधव,निशा कदम,वर्षा जावळे आदींसह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमादरम्यान नगरसेवक श्रीराम डोके, प्राचार्य तथा नगरसेवक विकी घायतडक, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, युवा नेते संतोष गव्हाळे, अशोक शेळके, उमेश माळवदकर,लहुशेठ पवार आदी मान्यवरांनी भेट देऊन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी सभापती तथा नगरसेविका सौ. राजश्रीताई मोहन पवार, सौ.शितल पंडित पवार, सौ. कांताबाई दिलीप गायकवाड व सौ. अर्चना लहु पवार आदींनी परिश्रम घेतले.

 

दरम्यान सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल प्रभाग सातमधील महिलांनी मोहन पवार यांचा सत्कार केला. हळदी-कुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व महिला भगिनींचा मोहन पवार व राजश्रीताई पवार यांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित बालगोपाळांनी सादर केलेल्या कार्यक्रमाने सर्वांची मने जिंकली. प्रभागातील महिला भगिनींच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुजित उबाळे यांनी केले तर आभारप्रदर्शन सभापती तथा नगरसेवक मोहन पवार यांनी मानले.

Back to top button