📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

अहिल्यानगर महामार्गावरील चौकाचे शिवरत्न जिवाजी महाले असे नामकरण केल्या बद्दल न. प. प्रशासनाचे मनःपूर्वक आभार- सौ. जयश्री विधाते.

अहिल्यानगर महामार्गावरील चौकाचे शिवरत्न जिवाजी महाले असे नामकरण केल्या बद्दल न. प. प्रशासनाचे मनःपूर्वक आभार- सौ. जयश्री विधाते.
 आपल्या बीड शहरातील अहिल्यानगर महामार्गावरील पोलीस मुख्यालयाजवळील चौकाचे शिवरायांच्या स्वराज्यातील निष्ठेची तलवार म्हणुन ज्यांना ओळखले जाते असे शुरवीर ‘शिवरत्न जिवाजी महाले चौक’ म्हणुन होत असलेले नामकरण इतिहासात  समता-स्वाभिमान आणि कर्तृत्वाचा सन्मान करणारा र्निणय म्हणुन नोंदवला जाईल.
    आपण बालपणी  इतिहास अभ्यासताना “होता जिवा म्हणुन वाचला शिवा” या प्रकरणातून राजे शिवछत्रपती-स्वराज्य- अफजल खानाची भेट-त्याचा वध.तलवार घेऊन महाराजांवर धावून आलेला सय्यद बंडा आणि क्षणाचाही विलंब न करता आपला जीव धोक्यात घालुन त्याचा प्रतिकार करणारे शुरवीर जीवाजी महाले. यांचे चरित्र स्वामिनिष्ठा-धैर्य-कर्तव्य-  प्रसंगावधान- स्वाभिमानाने ओतप्रोत भरलेले आहे. अशा महापुरुषाचे एखाद्या चौकाला दिलेले नाव भविष्यातील शेकडो पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल. गेली अनेक वर्ष मी ज्या परिसराच बीड नगर पालीकेत नगरसेवक म्हणुन प्रतिनिधित्व करत होते त्या परिसरातील चौकाला लोक-मागणीचा आदर करत केलेले नामकरण म्हणजे कोण्या एका समाजाचा नव्हे तर सर्वसामान्य रयतेचा केलेला सन्मान आहे. त्या बद्दल मा. सभापती तथा नगरसेविका जयश्री विलास विधाते यांनी जिल्हा आणि नगरपालिका प्रशासनाचे आभार मानले.
Back to top button