बीड
कंकालेश्वरची जमीन मोजून देण्यासाठी जिल्हाधिकारी प्रचंड उदासीन – बीड शहर बचाव मंच

कंकालेश्वरची जमीन मोजून देण्यासाठी जिल्हाधिकारी प्रचंड उदासीन – बीड शहर बचाव मंच
** दर्जेदार,शोभिवंत व भ्रष्टाचार मुक्त काम होण्यासाठी शिवशंकर भोलेनाथ यांना साकडे घालण्यात आले
***सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग श्रीमती जया ताई वाहणे यांचे काम असमाधानकारक
***उदासीनतेचे कारण अस्पष्ट
** विकास कामांचे आदेश पत्र तपशीलासह कंकालेश्वर येथे फ्लेक्स स्वरूपामध्ये लावून सार्वजनिक करावे अशी मंचाची आग्रही मागणी
**बीड शहर बचाव मंचाने जिल्हाधिकारी यांची भेट घेतली
*** बीड शहर बचाव मंचाचा कंकालेश्वर मंदिर विकास कामांचा तपशीलवार पाहणी दौरा
बीड प्रतिनिधी : बीड शहर बचाव मंचाच्यावतीने कंकालेश्वर येथे सुरू असलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा करण्यात आला. तपशीलवार पद्धतीने पाहणी करत असताना पुरातत्त्व विभाग सहाय्यक संचालक श्रीमती जया वाहणे यांचे काम असमाधानकारक व उदासीन असल्याचे स्पष्ट आढळून आले. विश्वस्त मंडळींना विश्वासात न घेता मनमानीचा कार्यक्रम चालू असल्याचेही दिसून येते. या दौऱ्याच्या वेळी उपस्थित असलेल्या विश्वस्त मंडळानी श्रीमती जया वाहणे यांच्या कामावर प्रचंड नाराजी व्यक्त केली. यानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कामाच्या ठिकाणी विकास कामाच्या आदेश पत्र तथा अंदाजपत्रकाचे सर्व तपशिलासह फ्लेक्स होर्डिंग तात्काळ लावण्यात यावे अशी आग्रही मागणी करण्यात आलेली आहे. परंतु जॉन्सन यांच्या वतीने कंकालेश्वर मंदिराची जमीन मोजून सर्व हद्दी निश्चित करून देण्याच्या बाबतीत प्रचंड उदासीनता दर्शवण्यात आली. या उदासीनतेचे कारण कळू शकले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर बीड शहर बचाव मंच व बीड शहरातील जनतेच्या वतीने सद्भावनेने विनंती करण्यात येत आहे की बीड शहराचे आध्यात्मिक वैभव असलेले अद्वितीय कंकालेश्वर महाशिव भोलेनाथ जलमंदिराचा विकास व पुनर्निर्माण सोहळा शास्त्रशुद्ध पद्धतीने, कल्पकतेने, शास्त्रोक्त-मंदिर निर्माण वास्तुविशारद अनुभवी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्याने भ्रष्टाचार रहित करण्यात यावा. या पाहणी दौऱ्यासाठी श्री. नितिनजी जायभाये, अध्यक्ष: बीड शहर बचाव मंच, कंकालेश्वर देवस्थानचे पुजारी व विश्वस्त संजयजी गुरव, डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष आरती परळकर, मातृभूमी प्रतिष्ठानचे डॉ. संजय तांदळे, डॉ. यशराज पवळ, सांस्कृतिक विभाग प्रमुख अमोल अंकुटे, सेवानिवृत्त शाम मार्कंडे सर, प्राचार्य कुरे सर, लोकशाही न्यूज चे भागवत वैद्य आदी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



