📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

प्राथमिक शिक्षक बँकेचे रोखपाल दिगंबर माने सेवानिवृत्त

प्राथमिक शिक्षक बँकेचे रोखपाल दिगंबर माने सेवानिवृत्त

माने यांचा सन्मानपूर्वक निरोप ; मुकुंद ढवळे यांचे पुन्हा जामखेड शाखेत स्वागत

जामखेड : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या जामखेड शाखेतील रोखपाल (कॅशिअर) दिगंबर गोपीनाथ माने हे ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त बँकेच्या संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा भावपूर्ण निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी कर्जत येथून शाखाधिकारी मुकुंद ढवळे यांची नुकतीच जामखेड येथील शाखेत बदली झाल्यामुळे स्वागत करण्यात आले.

यावेळी उपस्थितांच्या हस्ते माने व ढवळे यांचा मानाचा फेटा,शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बँकेतील सेवाकाळात त्यांनी दिलेले योगदान, कामकाजातील अनुभव, सहकाऱ्यांना केलेले मार्गदर्शन आणि सर्वांशी जपलेले जिव्हाळ्याचे संबंध यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे उपस्थितांनी कौतुक केले.

यावेळी प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक संतोषकुमार राऊत, विश्वस्त मुकुंदराज सातपुते, शाखाधिकारी मुकुंद ढवळे, केंद्रप्रमुख राम निकम, शिक्षक नेते एकनाथ चव्हाण,किसन वराट,विकास बगाडे, केशवराज कोल्हे,अर्जुन पवार,नारायण लहाने,तय्यब शेख,अशोक घोडेस्वार, राजीव मडके,विजय जाधव, हनुमंत निंबाळकर,नितीन वराट तसेच शाखेतील अधिकारी संतोष उगले व कर्मचारी संतोष मुरुमकर, राजेंद्र करगळ उपस्थित होते. माने यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, आनंद, समाधान व दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा देण्यात आल्या.

Back to top button