📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

कंत्राटी कामगारांचे सर्व प्रलंबित प्रश्न व थकीत देयके दिवाळीपूर्वी निकाली काढावीत* – *गौतम आगळे सर

कंत्राटी कामगारांचे सर्व प्रलंबित प्रश्न व थकीत देयके दिवाळीपूर्वी निकाली काढावीत* – *गौतम आगळे सर
परळी (प्रतिनिधी) दिं. २८ मागील आठ महिन्यापासून प्रलंबित असलेली घनकचरा व्यवस्थापनातील कार्यरत कंत्राटी कामगारांचे प्रलंबित प्रश्न व दिनांक 01.07.2026 ते 31.12. 2026. या कालावधीकरिता जाहीर करण्यात आलेले मूळ किमान वेतन + विशेष भत्त्याची रक्कम आजतागायत अदा केलेली नाही. म्हणून रोजंदारी मजदूर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी मा. जिल्हाधिकारी बीड यांना एक निवेदन सादर करून दिवाळीच्या अगोदर कंत्राटी कामगारांचे प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद/ नगरपंचायत यांना द्यावेत अशी आग्रहाची मागणी केली आहे. अशी माहिती संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष राजेश कुमार जोगदंड यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
     याबाबत अधिक माहिती अशी की मा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर 15 ऑगस्ट 2026 ते 20 ऑगस्ट 2026 सलग सहा दिवस संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष भाई राजेश कुमार जोगदंड यांनी अन्नत्याग उपोषण केले होते. त्यामुळे मा. जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय बीड, यांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद/नगरपंचायत यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की जिल्हाधिकारी बीड विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 05/02/2026 रोजी किमान वेतन अधिनियम आणि अद्यावत सुई – सवलतीची अंमलबजावणी करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली होती. मात्र आजतागायत त्याची पूर्तता न केल्यामुळे रोजंदारी मजूर सेनेच्या वतीने सतत आंदोलन करण्यात येत आहेत तथापि आपणाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल अद्याप या कार्यालयास प्राप्त झालेला नाही, सदरबाब ही गंभीर स्वरूपाची असून वारंवार सूचना देऊनही कार्यवाहीस विलंब का झाला याबाबतचे स्पष्ट कारण आज पर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेला नाही. सदर बाब ही गंभीर स्वरूपाची असून वारंवार सूचना देऊनही कार्यवाहीस विलंब का झाला याबाबत स्पष्ट कारण व आज पर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा. विहित मुदत समाधानकारक स्पष्टीकरण व अनुपालन अहवाल प्राप्त न झाल्यास आपल्या विरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याबाबत ची कार्यवाही का करण्यात येऊ नये, याची नोंद घ्यावी. असे पत्र दिनांक 6/10/2026 रोजी जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद /नगरपंचायत यांना देण्यात आले आहे.
      आता या पत्रावर जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद/ नगरपंचायत प्रशासनाने कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सर्व मागण्या तातडीने मान्य कराव्यात. कंत्राटी कामगारांना आर्थिक दिलासा देऊन त्यांना दिवाळीचा सण आनंदात साजरा करता यावा अशी अपेक्षा संघटनेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केली आहे.
Back to top button