बीड
देवस्थान इनाम जमीनधारकांचा १ नोव्हेंबरला राज्यव्यापी आक्रोश मेळावा

जमिनी खालसा करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी; छत्रपती संभाजीनगरातील मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी
देवस्थान इनाम जमीनधारक शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि देवस्थान इनाम जमिनी खालसा करून शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी रविवार, दि. १ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यव्यापी आक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता एन-८, सिडको येथील साखरे मंगल कार्यालयात हा मेळावा होणार असून, मराठवाड्यासह राज्यातील देवस्थान इनाम जमीनधारक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दशनाम गोसावी समाज परिषदेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष ओमप्रकाश गिरी यांनी केले आहे.
देवस्थान इनाम जमिनींचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. जमिनी कसूनही त्यांच्या मालकी हक्कांबाबत अनिश्चितता कायम असल्याने शेतकरी कुटुंबांच्या उपजीविकेचा आणि भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन देवस्थान इनाम जमिनी खालसा करण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करावा आणि जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी या मेळाव्यातून करण्यात येणार आहे.
या राज्यव्यापी मेळाव्याच्या माध्यमातून जमीनधारक शेतकऱ्यांच्या समस्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्यात येणार असून, जमिनींच्या हक्कांबाबत निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी संघटित लढा उभारण्यावर भर दिला जाणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर शासनाने आता ठोस भूमिका घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी भूमिका आयोजकांनी मांडली आहे.
या मेळाव्याला ॲड. राजेंद्र बन, श्री महंत दत्तात्रय गिरी महाराज, ॲड. जगदेव गिरी सर (परभणी), अवधूत गिरी सर (परभणी), रवी बन (राज्य मीडिया प्रमुख), ज्ञानेश्वर गिरी (अंबड), रामेश्वर पुरी (परभणी), प्रा. डॉ. मकरंद गिरी सर (लातूर), प्रवीण अनंत गिरी (लातूर), अनिल गिरी (हिंगोली), नवनाथ पुरी (परभणी), शांतीलाल लक्ष्मण गोसावी (कन्नड), बाजीराव गिरी, भगवान गिरी (बीड), शेषराव गिरी (अंबड) आणि गजानन गिरी (माहूर) यांच्यासह मराठवाड्यातील देवस्थान इनाम जमीनधारकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
देवस्थान इनाम जमीनधारक शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना बळ देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या लढ्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन ओमप्रकाश गिरी यांनी केले आहे.