बीड
लोकनेते स्व.विनायकराव मेटे साहेब यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

लोकनेते स्व.विनायकराव मेटे साहेब यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
बीड आणि मांजरसुंभा येथे रक्तदान शिबिर
रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित रहा – ज्ञानेश्वर कोकाटे,सुनील शिंदे
बीड (प्रतिनिधी)
लोकनेते विनायकराव मेटे साहेब हे वंचित उपेक्षितांचे कैवारी म्हणून महाराष्ट्रभर त्यांची ओळख होती. मराठा आरक्षण आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी त्यांनी आपली हयात संघर्ष करण्यात घालवली त्याचबरोबर त्यांनी इतर समाज आणि सामाजिक प्रश्नांसाठी देखील लढा उभा केला. ३० जून रोजी त्यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्राभर त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे चाहते आणि शिवसंग्रामचे मावळे सामाजिक उपक्रम राबवून साजरी करणार आहेत दि. ३० जून रोजी बीड आणि मांजरसुंभा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
स्व.विनायकराव मेटे यांनी आपल्या जीवनात सामजिक उपक्रमांना महत्व दिले सामजिक उपक्रम साजरे करत त्याचा सर्वसामान्याना फायदा व्हावा हा त्यांचा नेहमीच मानस असत त्यांनी त्यांच्या हायातीत देखील वाढदिवस साजरा करताना बिंदुसरा नदी स्वच्छ्ता मोहीम, शहर स्वच्छ्ता मोहीम, व्यसन मुक्ती अभियान, रोजगार मेळावे , रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप इत्यादी सामजिक उपक्रम राबवत आपले वाढदिवस साजरे केले. त्यामुळे स्व.मेटे साहेब यांना अभिप्रेत अश्या उपक्रमांनी त्यांची जयंती साजरी व्हावी या शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. ज्योती मेटे यांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत स्व. मेटे यांच्या चाहत्यांनी आणि शिवसंग्रामच्या मावळ्यांनी सामजिक उपक्रम राबवत त्यांची जयंती साजरी करण्याचा मानस केला आहे. या अनुषंगाने आज बीड शहरातील लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांच्या स्मृतीस्थळावर आणि मांजरसुंभा येथील मन्मथस्वामी चौक या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कोकाटे आणि सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी केले आहे.



