बीड

श्रीराम पार्टीच्या सभेत दर्शन नागू पावशे यांची अध्यक्षपदी एकमताने निवड

श्रीराम पार्टीच्या सभेत दर्शन नागू पावशे यांची अध्यक्षपदी एकमताने निवड

​श्रीवर्धन (संदेश घोलप ) श्रीवर्धन येथील जीवन कोळीवाडा येथील श्रीराम पार्टीची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. २७ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता दिवंगत अध्यक्ष वैकुंठवासी नागू भाया पावशे यांच्या निवासस्थानी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेला पार्टीचे सर्व सभासद, पंच कमिटी सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​सभेमध्ये पक्षाच्या विविध प्रशासकीय व सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व विषयांवर एकमताने निर्णय घेऊन सभेचे कामकाज सुरळीतपणे पार पडले.
​वैकुंठवासी नागू भाया पावशे यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडीचा महत्त्वपूर्ण विषय सभेपुढे ठेवण्यात आला. नागू भाया पावशे यांनी सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक क्षेत्रात केलेले निस्वार्थ कार्य, त्यांचे संघटन कौशल्य व प्रत्येक कार्यामधील आत्मीयतेची उपस्थितांनी भावपूर्ण शब्दांत आठवण करून दिली. त्यांचा हाच कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांचे सुपुत्र दर्शन नागू पावशे यांची सर्वानुमते श्रीराम पार्टीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
​नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर उपस्थितांनी दर्शन पावशे यांचे पुष्पगुच्छ, शाल व हार देऊन मनाचे अभिनंदन केले. हा सत्कार खालील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला:
​एकनाथ जाना वाघे (उपाध्यक्ष, श्रीराम पार्टी)
​नारायण बा रघुवीर (खजिनदार)
​महादेव जनार्दन रघुवीर (सभेचे अध्यक्ष)
​लक्ष्मण धर्मा वाघे (ज्येष्ठ मार्गदर्शक)
यावेळी उपस्थितांनी वैकुंठवासी नागू भाया पावशे यांनी ज्या निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि समाजहिताची भावना ठेवून पार्टीचे नेतृत्व केले, त्याच आदर्शाचा वारसा दर्शन पावशे यांनीही पुढे चालवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
​नवीन अध्यक्ष दर्शन नागू पावशे यांनी सर्व सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. तसेच, दिवंगत वडिलांच्या कार्यपद्धतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजहित, धार्मिक परंपरा आणि संघटनेच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची ग्वाही दिली.
​श्रीराम पार्टीच्या अध्यक्षपदी झालेल्या या निवडीमुळे सर्व सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, संघटनेच्या पुढील वाटचालीला नवे बळ मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
Back to top button