📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

बीड गट शिक्षण कार्यालयातर्फे शिक्षण विषयक एक दिवसीय कार्यशाळा संपन्न 

बीड गट शिक्षण कार्यालयातर्फे शिक्षण विषयक एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
शैक्षणिक कामकाजातील प्रभावी अंमलबजावणीसाठी  गट शिक्षणाधिकारी समंदर खान यांनी केले मार्गदर्शन
बीड  दि. 23 एप्रिल 2025  प्रतिनिधी:- जिल्हा परिषदेच्या गट शिक्षण विभागातर्फे तालुका गट शिक्षण अधिकारी कार्यालय, बीड यांच्या वतीने दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी विविध शैक्षणिक काम काजांसंदर्भात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन शिवाजी विद्यालय बीड येथे करण्यात आले. सदर कार्यशाळा दुपारी 12 वाजता सुरू झाली .
या कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी मा. श्री. समंदर खान हे होते. त्यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना शाळांमधील विविध शैक्षणिक व प्रशासकीय बाबींवर सखोल मार्गदर्शन केले. शिक्षणाशी निगडित महत्त्वाच्या 12 मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर तोडकर, श्री माटे ,श्रीमती गंगाखेडकर मॅडम, श्री क्षीरसागर, सर्व केंद्रप्रमुख व साधन व्यक्ती मोमीन इसहाक आदी उपस्थित होते.
कार्यशाळेत प्रमुख मुद्द्यांमध्ये खालील बाबींचा समावेश होता:
स्कुल मॅपिंग – शाळांचे नकाशीकरण, विद्यार्थ्यांची वस्तुनिष्ठ विभागणी, व स्थानिक गरजेनुसार शाळांचे पुनर्रचना सुचवणे. आधार अपडेट – विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अपडेट करून यू डायस प्रणालीशी लिंक करणे. अपार रजिस्ट्रेशन – विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाच्या अप्पार योजनेत ऑनलाइन नोंदणी. निपुण महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ऑनलाइन माहिती भरावी लागणार असून त्यासंबंधी मार्गदर्शन देण्यात आले. व्ही एस के ॲप वर विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती व सहभाग याची नोंद करण्याच्या सूचना. यू डायस प्लस प्रणाली अंतर्गत शिक्षक व विद्यार्थी प्रोफाइल तयार करणे व प्रमाणीकरण प्रक्रिया.  ड्रॉप बॉक्स सिस्टिम संदर्भात माहितीची देवाणघेवाण सुलभ करण्याचे मार्गदर्शन. विद्यार्थी भरती व शाळांची माहिती – इतर शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांची माहिती वेळेत भरणे, व त्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुबक करणे. पॅट 3  विद्यार्थ्यांच्या चाचणी माहितीचे संकलन व विश्लेषण. शालेय पोषण आहार व शिक्षक संवाद – यासाठी स्वतंत्र माहिती अहवाल शाळांनी तयार करावा. उल्लास नवभारत साक्षरता अभियान – 2025-26 साठी सर्वेक्षण व माहिती संकलनाचे नियोजन. एनरोलमेंट – नवीन प्रवेश, वर्गनिहाय संख्या, गटातील समतोल राखणे आदी विषयांचा समावेश होता. बीड तालुकयातील सर्व केंद्र प्रमुख साधन व्यक्ती यांनी केंद्र निहाय तयार करण्यात आलेल्या दालनात विविध समस्यांविषयी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेमध्ये विविध शाळांतील मुख्याध्यापकांनी उपस्थित राहून  अनुभवांची देवाणघेवाण केली. श्री. समंदर खान यांनी प्रत्येक मुद्द्यावर सखोल चर्चा करताना शासनाच्या नवीन धोरणांची माहिती दिली तसेच शाळांना दर्जात्मक शिक्षण पुरविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेचा समारोप करताना गटशिक्षणाधिकारी यांनी असे  मुख्याध्यापक ज्यांचे काम पुर्ण आहे त्यांचे कौतुक केले  .
Back to top button