बीड

अजित पवार यांनी विकास कामात कधीच राजकारण केले नाही – नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा 

अजित पवार यांनी विकास कामात कधीच राजकारण केले नाही – नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा
    अंबेजोगाई प्रतिनिधी, बालाजी देशमुख- सतत विकास कामाचा ध्यास असणारे उपमुख्यमंत्री  तथा  अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी विकास कामात कधीच राजकारण केले नाही असे मत व्यक्त करून नगराध्यक्ष नंदकिशोर        मुंदडा यांनी  आज दिनांक 30 जानेवारी  रोजी  येथील नगर परिषद मध्ये  उपमुख्यमंत्री अजित पवार यांना  त्यांचे प्रतिमेस पुष्पहार देऊन श्रद्धांजली अर्पण  केली . या वेळी भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी, नगरसेवक संजय गंभीरे,  गणेश देशमुख, महेश आंबाड, किरण भालेकर, सोनल धायगुडे, श्रीकांत धायगुडे, रचना परदेशी, ad. काकडे, महेश लोमटे, सचिन जाधव,  संतोष शिनगारे, प्रशांत आदनाक,हिंडलाल काकडे, महादेव आदमाने, बाळासाहेब दौडतले, किशोर परदेशी, अक्षय भूमकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.             नगराध्यक्ष नंदकिशोर      मुंदडा पुढे म्हणाले की, आपले अजितदादाचे  कार्यकर्त् या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी रामभाऊंनी आता श्रद्धांजली व्यक्त केली आहे. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने, सदरचे नगराध्यक्ष, आदरणीय दादांना श्रद्धांजली देत आहे. आज आपण सगळेजण, परवा दिवशी, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं दुर्दैवी निधन झालं. महाराष्ट्रावर ही शोककळा पसरलेली आहे. कुटुंबावर तर आहेच आहे पण महाराष्ट्रावर ही शोककळा आहे. मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात जास्त उप-मुख्यमंत्री होणारे आणि वित्तखातं सांभाळणारे, मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक त्यांच्या नावानं झालाय, ते रेकॉर्ड कुणी मोडू शकणार नाही. त्यांची प्रशासनावर असलेली कमांड आणि एखादी गोष्ट करायची म्हणलं, तर जग जरी उडत असलं तरी ती चांगली गोष्ट करायची असलेली ताकद, मला वाटतं हे त्यांचं, त्यांच्याबद्दलचं फार मोठं मत समाजाचं आहे. माझा, माझ्या कुटुंबाचा आणि त्यांचा, गेली 35 वर्षं त्या परिवाराशी आमचं नातं आहे. आम्ही जरी पक्ष बदलला, तरी हे, वैयक्तिक नातेसंबंध हे आजही आम्ही त्यांनीच टिकवून ठेवले आहेत. मला वाटतं, अजितदादांकडे बघताना दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एकीकडे पक्ष म्हणून त्यांचं काम, बाकी स्वतःचं म्हणून त्यांचं काम, पण त्याच्यापेक्षाही, विकासात त्यांनी राजकारण आणलं नाही, विरोधक जवळचा कधी सम-अ समजलं नाही, आणि मला वाटतं जिल्ह्याचं सगळ्यात मोठं नुकसान झालं. बीड जिल्ह्याला संधी होती की राज्याचे वित्तमंत्री, आणि ऑन द स्पॉट निर्णय घेणारे सन्माननीय उप-मुख्यमंत्री बीड जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभले. मला वाटतं जिल्ह्याचा आणखीन जोरात कायापालट होण्याची सुरुवात होत होती, अशा वेळेस ते आपल्यातून निघून गेले. मला वाटतं विकासात्मक कामचं काय, हा प्रश्नचिन्ह आपल्यासमोर पुन्हा निर्माण होणार की काय, अशी परिस्थिती मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या समोर. लिखिताच्या समोर कुणाचं काही चालत नाही. हे परत एकदा निसर्गाने दैव्यानं हे सिद्ध केलं. परंतु असा नेता घडायला खूप वर्षं जावे लागतात. खूप वर्षं त्यांनी कष्ट करायला लागतात, खूप वर्षं महाराष्ट्राचा अभ्यास करावा लागतो, मला वाटतं, स्पष्ट बोलणारा, ओठात आहे ते ओठात बोलणारा, आणि मला वाटतं एखादा शब्द दिला तर त्याची जात, ती जाणणारा नेता आपल्यातून गेला, मला वाटतं हे शोककळा, ही न भरून निघणारी शोककळा आहे. मला वाटतं ही विकासाची पोकळी, आणि अशा नेतृत्त्वाची पोकळी, कधीच भरून येणार नाही, असं हे नेतृत्व आहे. मला वाटतं आपल्या सर्वांच्या वतीने, मी त्यांना आदराने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि ईश्वरास प्रार्थना करतो की, त्यांच्या आत्म्याला शांती देवो, आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या जनजीवनात त्यांचा विकासात्मक वारसा, राज्य शासनाच्या माध्यमातून पुढं चालावा, हीच आई जगदंबेश्र्वरी चरणी प्रार्थना करतो, कारण त्यांची आठवण ही तुमच्या-आमच्या हृदयामध्ये विकासाचं काम करणारा नेता, मला वाटतं हीच मला वाटतं त्यांची आठवण आहे. मला वाटतं बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर सुद्धा, त्यांनी आमदार नमिता मुंदडांचा कायम सन्मान केला, कायम विकासात्मक ह्याच्यामध्ये निर्णय घेतला, आणि आमदारांना सुद्धा प्रत्येक आमदारांना न्याय देणारा नेतृत्व म्हणून त्यांची ही बीड जिल्ह्याची ओळख, कदाचित कुठली जाणं नाही, म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं परत एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी बसून हे असं म्हणून बोलतोय की मला इतकी वेळ  उभा टाकणं शक्य नाही, म्हणून मी बसून श्रद्धांजली देत आहे. ओम शांती. असे काकाजी म्हणाले.
Back to top button