बीड
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृती योजना हा सन्मान की अपमान – आझाद क्रांती सेनेचे केज तहसीलदार यांना निवेदन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृती योजना हा सन्मान की अपमान – आझाद क्रांती सेनेचे केज तहसीलदार यांना निवेदन
केज:-थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने मातंग समाजातील (व तत्सम १२ पोटजातीतील) विद्यार्थी जे दहावी, बारावी, पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमात किंवा अभियांत्रिकी व वैद्यकीय परीक्षेत ६०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवतात, त्यांना दहावीसाठी १०००रू, बारावी १५००रू, पदवी व पदविका २०००रू, अभियंतिकी व वैद्यकीयसाठी २५००रू, शिष्यवृत्ती देण्यात येते, ही शिष्यवृत्ती वाढवून ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत वाढवावी, या प्रमुख मागणीसह आझाद क्रांती सेना केज यांनी २७/०६/२०२५ रोजी तहसीलदार मा.राजेश गिड्डे साहेबांना निवेदन देण्यात आले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाला मुबलक निधी उपलब्ध करून देण्यात यावा. तूटपूंजा निधी देऊन हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान नसून अपमान आहे. त्यामुळे या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान व्हावा याच मागणीसह आझाद क्रांती सेना तालुका अध्यक्ष शरद थोरात, शहरप्रमुख इरफान पठाण, मार्गदर्शक बाबुराव गालफाडे सर, दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष विनायक लोंढे, रावण गालफाडे, मोहन पोळ, इत्यादींच्या उपस्थितीत केज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.



