गावातील एकोपा जपत सरपंच कैलास घुगे यांनी बोरफडी गाव बनवले आदर्श…

घुगे यांनी बोरफडी गाव बनवले आदर्श…
माहेरवाशील लेकीसारखे रिंकु राजगुरूचे स्वागत!
आर्ची आली आर्ची म्हणत स्वागतासाठी गावकरी रस्त्यावर
बीड, प्रतिनिधी :- अतिशय दुर्गम भागातील गाव म्हणून बोरफडी गावाची ओळख आहे… आठरा पगड जाती- धर्मातील लोकांनी विकासाच्या मुद्यावर कैलास घुगे या तरूणाला सरपंच केले… गावकर्यांचा विश्वास सार्थ ठरवत कैलास घुगे यांनी गावातील एकोपा आणि एकात्मता जपत सर्व जाती- धर्माच्या लोकांच्या साथीने विकासातुन गावाचा कायापालट केला. याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली अन् पंचायत राज विभागाच्या जनजागृती मोहीमेतून महाराष्ट्राची सुपरस्टार अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरू शुक्रवारी (दि.20) बोरफडी येथे आली… माहेरवाशीन लेकीचे स्वागत करावे, अशा पध्दतीने बोरफडी ग्रामस्थांनी रिंकू राजगुरूचे स्वागत केले… यावेळी गावातील अबालवृध्द कार्यक्रमास उपस्थित होते…
गावाचा विकास ही केवळ संकल्पना नसते तर तो एक विचार असतो… हा विचार जगताना गावगाड्यातील आठरा पगड जाती- धर्माचा एकोपा जपावा लागतो… बीड तालुक्यातील अतिशय दुर्गम डोंगरात वसलेल्या बोरफडी गावात आठरा पगड जाती धर्माचे लोक वास्तव्य करतात… या सार्या लोकांना सोबत घेत तरूण सरपंच कैलास घुगे यांनी क्रांती केली आहे… पंतप्रधान मोदीजींच्या सर्वांचा विकास, सर्वांची साथ या ब्रीदवाक्याला प्रमाण माणून ते काम करत आहेत… अवघ्या दोन- तीन वर्षात त्यांनी गावात तब्बल 15 कोटीची दर्जेदार विकासकामे केली आहेत… गावातील 15 ते 16 वस्त्यांना रस्ते, वीज, पाणी या सोय- सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत… प्राप्त परिस्थिती अतिशय प्रतिकुल असताना देखील सरपंच कैलास घुगे यांनी बोरफडी गावाला आदर्श गाव बनवले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या पंचायतराज विभागाने शुक्रवारी (दि.20) बोरफडी येथे प्रसिध्द अभिनेत्री रिंकु राजगुरे यांचा कार्यक्रम घेतला… सध्या शेती कामे असताना देखील बोरफडी गावातील महिला, मुले, तरूण आणि अबालवृध्द ग्रामस्थ रिंकु राजगुरू यांच्या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी सजवलेल्या बैलगाडीतून रिंकू राजगुरू यांची मिरवणुक काढण्यात आली.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहेमान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, गटविकास अधिकारी अनिरूध्द सानप, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शेळके, सरपंच कैलास घुगे, उपसरपंच सनिल कुटे, राणा डोईफोडे, बप्पासाहेब घुगे, लालासाहेब घुगे, विस्तार अधिकारी पारटकर, ग्रामविकास अधिकारी विवेक गिते, चव्हाण तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि महिला, पुरूष ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
चौकट…
बोरफडी गावचा आदर्श
घ्या: रिंकू राजगुरू
अतिशय दुर्गम भागात असतानाही बोरफडी गाव आणि सरपंच कैलास घुगे यांनी जो विकास केला आहे, तो अद्भुत आहे. ईतर गावांनी देखील बोरफडी गावाचा आदर्श घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिध्द अभिेनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरू यांनी माध्यमाशी प्रतिक्रीया देताना केले.
चौकट…
एकोप्यातच गावाची
समृध्दी: जितिन रहेमान
सामाजिक सलोखा अ्राणि गावगाड्याच्या एकोप्यातच समृध्दी आहे. गावाची एकी असेल, सर्व जाती- धर्मातील लोक गुण्या गोविंदाने नांदत असतील तर गावाचा विकास होतो. गाव समृध्द बनते… सरपंच कैलास घुगे यांनी गावाची एकता आणि एकोपा जपला. यामुळेच आज बोरफडी गाव आदर्श बनले आहे. यामुळे तरूण सरपंच असलेल्या कैलास घुगे यांचे कौतुक वाटते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहेमान यांनी केले.
—————-



