संपादकीय

“तुम्ही ह्या देशात आहात कि परदेशात”, तुमचा ठावठिकाणा सांगा

मुंबई | माजी मुख्यमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटीच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी आयुक्त परमबिर सिंग हे देखील चांगलेच अडचणीत आले आहेत. परमबिर सिंह यांना अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी त्यांच्या वकिलांनी याचिका दाखल केली होती.मात्र त्यानंतर न्यायालयाने परमबिर सिंह यांनाच काही उलट प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या वकिलांनाच प्रश्न विचारले आहेत, ‘परमबीर सिंह हे जगाच्या कोणत्या भागात आहेत? तुम्ही या देशात आहात की परदेशात? आधी तुमचा ठावठिकाणा सांगा.’ असं खडसावलं आहे. याशिवाय ‘तुम्ही असं फरार होऊन व्यवस्थेवर किती विश्वास आहे. हेच दाखवून देत आहात.’ असं सुनावलं आहे.

याशिवाय न्यायालयाने परमबीर सिंह यांना ‘तुम्ही पोलिस आयुक्त होतात म्हणून तुम्हाला वेगळी वागणूक मिळणार नाही. केवळ अटकेपासून संरक्षण मिळाले तरच भारतात येणार, असं काही तुमच्या बाबतीत आहे का?’ असा सवाल न्यायालयाने केला आहे. अनिल देशमुखांवर आरोप केल्यानंतर पासून परमबीर सिंह हे गायब झाले आहेत. त्यामुळे न्यायालयाने त्यांना फटकारलं आहे.

एकंदरीतच परमबीर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता परमबीर सिंह यांच्या बंगल्यावर ते फरार असल्याची नोटीस लावली जाऊ शकते. शिवाय आता त्यांना न्यायालयात हजर होण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. या ३० दिवसात जर ते हजर झाले नाहीत. तर मुंबई पोलिस परमबिर सिंह यांची मालमत्ता जप्त करण्यास सुरूवात करू शकतात.

Back to top button