संपादकीय

भाजप नेत्याच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे चोख प्रतिउत्तर !

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये. त्यातच सत्तेत असलेल्या आघाडी सरकारवर टीका करण्यात येत आहे. महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंसारखा पार्टटाईम नाही तर देवेंद्र फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री पाहिजे, उद्धव ठाकरे कधी उठतात, कधी झोपतात आणि कधी काम करतात हे सर्व जनतेला माहिती झाले आहे, असं वक्तव्य भाजपचे महाराष्ट्र प्रभारी आणि भाजप राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांनी काल केलं होतं. त्यावर आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

शिवसेना नेते व महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे दौऱ्यावर असताना रवी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता कोरोनाकाळात महाराष्ट्र सरकारने सुयोग्य नियोजन केल्याने न्यायालयासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केलं असल्याचं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी सरचिटणीस सीटी रवी
यांना नाव न घेता दिले आहे.

एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार योग्य पद्धतीने काम करत आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपने आरोपांच्या फैरी झाडायला सुरूवात केली. परंतू, आम्ही त्या आरोपांकडे लक्ष देत नाही आणि कोरोना संकटाचा सामना करत आहोत व विकास कामंही करत आहोत, असं म्हणत त्यांनी सीटी रवी यांच्या वक्तव्यावरून भाजपवर पलटवार केला आहे.

Back to top button