बीड

ज्ञानराधाच्या घोटाळ्याप्रकरणी एमपीआयडी मंजुर पण गंगाभारती महाराज सारख्या पतसंस्थेतील ठेवीदारांचे काय?  ठेवीदार आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा ईशारा :- हरिओम क्षीरसागर

ज्ञानराधाच्या घोटाळ्याप्रकरणी एमपीआयडी मंजुर पण गंगाभारती महाराज सारख्या पतसंस्थेतील ठेवीदारांचे काय?  ठेवीदार आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा ईशारा :- हरिओम क्षीरसागर

लिंबागणेश:-(दि.२१) ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या घोटाळ्याप्रकरणी विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी ६०० कोटींच्या मालमत्तेचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे देणार असल्याचे जाहीर केले त्यामुळे ठेवीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.या पतसंस्थेवर प्रशासक नेमला होता तसेच त्या प्रशासकांनी मांजरसुंबा येथील शाखेत अपहार आढळल्याने तेथील कर्मचारी भागवत मस्कर, अभिमान वाघमारे व पिंपळवंडी शाखा येथील अमोल मस्कर हे याच्यात दोषी आढळले असून त्यांच्यावर प्रशासकाने गुन्हे देखील दाखल केले आहेत. मात्र हे आरोपी अद्याप दीड वर्षापासून फरार असून पोलिसांना देखील सापडत नाहीयेत. मात्र गंगाभारती महाराज पतसंस्था यांचे अध्यक्ष, सचिव,संचालक मंडळ शाखाधिकारी, कर्मचारी अजूनही मोकाट असुन त्यांच्या मालमत्तेवर टाच कधी आणणार? आणि संचालकांना कधी ताब्यात घेणार असा प्रश्न  ठेवीदारांमधुन उपस्थित केला जात असुन ठेवीदार आक्रमक झाल्याने युवा ग्रामीण पत्रकार संघाचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष हरिओम क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवीदारांसमवेत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
बीड तालुक्यातील करचोंडी येथील गंगाभारती महाराज बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित असुन या पतसंस्थेच्या शाखा मांजरसुंभा,चौसाळा,लिंबागणेश, आणि करचोंडी याठिकाणी होत्या.मागील २ वर्षांपासून हि पतसंस्था बूडीत असुन यामध्ये अडकलेल्या ठेवीदारांच्या ठेवी देण्यास नकार देत आहे.ठेवीदारांनी वारंवार जिल्हाधिकारी,तालुका उपनिबंधक तसेच पोलिस अधिक्षक कार्यालय आर्थिक गुन्हे शाखा याठिकाणी लेखी निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केलेली आहे.परंतु याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले असुन आता ठेवीदारांनी आक्रमक पवित्रा घेतला लवकरात लवकर असुन ठेवीदारांच्या ठेवी देण्यात याव्यात आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ तसेच शाखाधिकारी, कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत.या प्रमुख मागणीसाठी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष हरिओम क्षीरसागर यांनी ठेवीदारांसोबत दि.२५ मंगळवार रोजी पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा ईशारा दिला आहे.
Back to top button