बीड
वय वृद्ध विधवा महिलेच्या अंगावर रिक्षा घालून हनमार करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करा

वय वृद्ध विधवा महिलेच्या अंगावर रिक्षा घालून हनमार करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करा
एस पी यांच्या दालनासमोर आंदोलन करू. नितीन सोनवणे
बीड :-खांडे_पारगाव येथे स्वाती संदेश डोळस या महिलेच्या आईच्या अंगावर रिक्षा का घातला. वयोवृद्ध आजीच्या गुडघ्याला मार लागलेला आहे, म्हणून विचारणा केली असता रात्री 8 वाजता भांडण झाले, स्वाती डोळस या विचारायला गेले असता त्यांचे केस धरून खाली पाडून लोखंडी रोडने हनमार केली डोक्यात गज मारला त्यांना पाच टाके पडलेले आहेत पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे तक्रार घेतली नाही सिविल हॉस्पिटल बीड येथे ते ऍडमिट आहेत.
स्वाती डोळस यांना वडील नाहीत भाऊ नाही आई व एक बहीण या व्यतिरिक्त त्यांना सहारा नाही याचा फायदा घेऊन. रिक्षा चालकाने दारू पिऊन रिक्षा अंगावर घातला. व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्या थोडक्यात बचावल्या. भाऊ म्हणून आम्ही आजपासून त्यांच्या सदैव सोबत आहोत.
आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल बीड या ठिकाणी जाऊन पेशंटची आस्तविकपणे चौकशी केली. ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने डोळस कुटुंबीयांच्या सोबत आम्ही ठामपणे उभा आहोत बीड एसपी स्थानिक पोलीस स्टेशन यांना संघटनेचे वतीने विनंती करतोय तात्काळ ॲट्रॉसिटी ॲक्ट,307 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करा.
पेशंटची तब्येत सिरीयस आहे डोळ्यावरती खूप सूज आली आणि मार लागलेला आहे सिव्हिल हॉस्पिटल येथील डॉक्टरांना पेशंट कडे लक्ष देण्यास सांगितले.
तात्काळ सर्व आरोपींना अटक करा अन्यथा एस पी ऑफीस या ठिकाणी कुटुंबियांना घेऊन व नितीन सोनवणे जिल्हाध्यक्ष,ऑल इंडिया पॅंथर सेना , सुंदर वाघमारे, अरविंद सरवदे यांच्या वतीने आंदोलन केले जाईल..



