बीड
बळवंतराव कदम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बाल दिन साजर

बळवंतराव कदम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बाल दिन साजर
येळंब (घाट) दिनांक 14 नोव्हेंबर:येथील बळवंतराव कदम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक 14. नोव्हेंबर 2025 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान व आधुनिक भारताचे शिल्पकार जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती देशभर ‘बालदिन’ साजरा करण्यात येतो. विद्यालयाचे प्राचार्य श्री राजकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीविद्यालयाचे ज्येष्ठ प्रा. श्री सोंडगे बी. बी. होते तर मंचावर ज्येष्ठ प्रा. श्री कदम एस. एस. , ज्येष्ठ शिक्षक श्री कदम बी. एस., व वरिष्ठ लिपिक श्री सुधीर पायाळ यांची प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात पंडीत नेहरू यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी बोलताना प्राचार्य श्री राजकुमार कदम यांनी पंडीत नेहरू यांच्या जीवनकार्याचा विस्तृत आलेख सर्वांसमोर मांडला. यावेळी त्यांनी पंडित नेहरू यांच्या आधुनिक भारताच्या उभारणीत दिलेल्या योगदानाचे महत्त्व विषद करताना विज्ञानाभिमुख होण्याचे आवाहन केले. तर श्रीम गणगे व्ही. एम. व श्री सोंडगे बी. बी. यांनी पंडीत नेहरू ते चाचा नेहरू या प्रवासाची महती सांगितली. कार्यक्रमाचे संचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री घाटे ए. एस. यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री चौरे व्ही. एस. यांनी केले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. पंडीत नेहरू यांना सामूहिक अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
– (मुख्याध्यापक बळवंतराव कदम माध्यमिक विद्यालय येळंब घाट.)



