बीड

खळेगाव ग्रामपंचायत चा भ्रष्टाचार चव्हाट्यावर  वरिष्ठ अधिकारी अन् राजकीय लोकप्रतिनिधी दुर्लक्ष 

खळेगाव ग्रामपंचायत चा भ्रष्टाचार चव्हाट्यावर

वरिष्ठ अधिकारी अन् राजकीय लोकप्रतिनिधी दुर्लक्ष

कोळगाव – गेवराई तालुक्यातील खळेगाव ग्रामपंचायतचा कारभार भ्रष्टाचारयुक्त चालू असून ग्रामसेवक आणि सरपंच मनमानी पद्धतीने कारभार चालत आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी अन् राजकीय लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहे. ग्रामपंचायत अंतर्गत शासकीय अंदाजपत्रक नुसार दोन वर्षापासून कुठेही काम नियमित झाले नाही. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार कुठले हे काम केलेले नसून जे काम झाले ते बोगस झाले आहे. आणि ग्रामपंचायत चे ठराव व सभा या पूर्ण सरपंच व ग्रामसेवक यांनी बोगस सह्या केलेल्या असून याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी उपसरपंच सचिन आहेर, ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.
   गेवराई तालुक्यातील खळेगाव मध्ये मागील दोन वर्षापासून सुरू असलेल्या खळेगाव भ्रष्टाचाराची चौकशीसाठी चौकशी समिती गेवराई पंचायत समिती चे विस्तार अधिकारी सोनवणे आणि विस्ताराधिकारी राठोड हे आले असता खळेगाव मध्ये गेल्या दोन वर्षापासून अनेक कामे झाली असली तरी या सर्व मनमानी कारभार झाला. असून यामध्ये उपसरपंच तथा सहा सदस्यांच्या सदस्यांच्या ग्रामसभा व आमसभा यावर प्रोसिडिंग आणि मासिक मीटिंगच्या सात सदस्यांच्या बोगस सह्या असल्याचा आरोप उपसरपंच व सदस्यांनी केलेला आहे. तरी दोन वर्षापासून ग्रामपंचायत अंतर्गत अंदाजपत्रक नुसार कुठेही काम केले नाही. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार कुठले हे काम झालेले नसून जे काम झाले ते बोगस झाले आहे. आणि ग्रामपंचायत चे ठराव व सभा या पूर्ण सरपंच व ग्रामसेवक यांनी बोगस सह्या केलेल्या असून याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी उपसरपंच सचिन आहेर ग्रामपंचायत सदस्य रेखा वाघ, शिवगंगा आहेर, लता छडीदार, राजश्री छगन कदम, सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र गावडे, उमाकांत शिंदे, आहेर महाराज, मनोज शेंबडे पाटील यांनी चौकशी समितींना लेखी स्वरूपात अर्ज केला. असून तात्काळ योग्य ती कारवाई करावी यासाठी ग्रामस्थांनी समिती कडे अर्जाद्वारे लेखी मागणी करुन सखोल चौकशी करण्याची ग्रामस्थांनी केली आहे.
Back to top button