📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

बीडचे भूमिपुत्र तथा सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठाची पीएचडी प्रदान 

बीडचे भूमिपुत्र तथा सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठाची पीएचडी प्रदान
सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव..!
बीड दि.२२(प्रतिनिधी)- मराठी चित्रपट सृष्टीतील अनुभवी अभिनेते बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र मिलिंद रामदास शिंदे यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठातून पीएच डी ही पदवी प्रदान करण्यात आली. पीएचडी मिळाल्या बद्दल अभिनेते मिलिंद शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
  मराठी चित्रपट सृष्टीतील अनुभवी अभिनेते तथा बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र श्री मिलिंद रामदास शिंदे यांचे पाटोदा तालुक्यातील निरगुडी  हे मूळ गाव आहे. त्यांचे वडील रा.जा. शिंदे हे बीड जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पबचत अधिकारी पदावर कार्यरत होते. पुढे त्यांनी कायद्याची पदवी घेऊन अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय सुरू केला होता. दरम्यान अभिनेता मिलिंद शिंदे हे अनेक वर्ष बीडच्या बीअँड सी क्वार्टर मध्ये वास्तव्य करत होते. त्यामुळे त्यांना बीड जिल्ह्यासह बीड शहराची खडा ना खडा माहिती आहे. अभिनयाची आवड असल्याने मिलिंद शिंदे यांनी नाटकाच्या माध्यमातून चित्रपट दुनियामध्ये पदार्पण केले. कसदार अभिनयातून त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवीला. ‘झुलवा’ ती फुलराणी, कथा अरुणांची, यासारख्या अनेक गाजलेल्या नाटकापासून ते “नटरंग, पारध, नॉट ओन्ली मिसेस राऊत, या चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप भावली. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षक मायबापांनी नेहमीच दाद दिली आहे. छोट्या पडद्यावरही ‘तू तिथे मी’ आणि ‘देव माणूस’ आदी मालिका मधील त्यांच्या भूमिका संस्मरणीय आहेत. अभिनेते विजय तेंडुलकर यांच्या नाटकातील ‘स्त्री भूमिका’ या विषयावर अभिनेता मिलिंद शिंदे यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठात पीएचडीसाठी प्रबंध सादर केला. त्या बद्दल त्यांना नुकतीच  मान्यवरांच्या हस्ते पीएचडी पदवी  मोठ्या शानदार सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आली. अभिनेते मिलिंद शिंदे यांना पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल बीड जिल्ह्यात सह राज्यभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Back to top button