बीड

एच आय व्ही मुक्तीसाठी युवकांनी योगदान द्यावे- श्री.सुहास कुलकर्णी

एच आय व्ही मुक्तीसाठी युवकांनी योगदान द्यावे- श्री.सुहास कुलकर्णी
आंतरराष्ट्रीय व पंधरवाडा उत्साहात साजरा
प्रतिनिधी गढी -एचआयव्ही  प्रतिबंधासाठी जनजागृती करणे खूप महत्वाचे आहे. असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित सुया आणि संक्रमित रक्ताद्वारे एचआयव्ही पसरतो. त्यामुळे, एचआयव्ही प्रतिबंधासाठी लोकांना शिक्षण देणे, चाचणीसाठी प्रोत्साहित करणे आणि सुरक्षित लैंगिक संबंधांचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. एच. आय. व्ही. मुक्तीसाठी युवकांचे भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन श्री. सुहास कुलकर्णी यांनी केले.
 जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर गढी येथे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रेड रेबन क्लब व आयसीटीसी सेल उपजिल्हा रुग्णालय गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय युवा पंधरवाडा निमित्त आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री.सुहास कुलकर्णी कार्यक्रम अधिकारी,एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय बीड) व श्री सुनील सरवदे (समुमपदेशक आयसीटीसी उपजिल्हा रुग्णालय गेवराई )तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे  हे उपस्थित होते.प्रमुख पाहूणे म्हणून पुढे बोलताना श्री.सुहास कुलकर्णी म्हणाले की एड्सवर उपचार उपलब्ध असले तरी ते पूर्णपणे बरे होणारे नाहीत. त्यामुळे जनजागृतीमुळे लोकांना योग्य वेळी उपचार घेण्यास आणि काळजी घेण्यास मदत होते. एच.आय.व्ही.ची
नियमित चाचणी केल्याने संसर्ग लवकर ओळखता येतो आणि उपचार सुरू करता येतात. यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका कमी होतो. यावेळी त्यांनी एड्स जनजागृतीच्या प्रदीर्घ कार्यातील अनुभव उपस्थितीतांना सांगितले.  श्री. सुनील सरवदे यांनी आपल्या व्याख्यानातून आयसीटीसी सेलच्या माध्यमातून व विविध शाळा महाविद्यालयात स्थापित असणाऱ्या रेड रिबन क्लबच्या माध्यमातून एच आय व्ही/एड्स निर्मूलनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली.त्यांनी सांगितले की एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्रात(आयसीटीसी )  सरकारी दवाखान्यात एच आय व्ही ची मोफत तपासणी केली जाते.यामध्ये संपूर्ण गोपीनियता ठेवून समुपदेशन केले जाते. आजही एच. आय व्ही. बाधितांची संख्या समाजात भरपूर आहे. ही चिंताजनक बाब आहे 16 ते 35 या वयोगटात याच्या प्रसारचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी शपथ घ्या की आपण आपल्या भारतीय परंपरेतील एक पती /एक पत्नी व्रत,नैतिकता, सदाचार इत्यादी गुणांची जोपासना करून सोशल मीडियावरील अपप्रचार व अनिष्ट. बाबींना बळी पडणार नाही तसेच  आपल्या आसपासच्या लोकांमध्ये निरामय आरोग्यासाठी प्रचार आणि प्रसार करु. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य सदाशिव सरकटे यांनी पुरातन भारतीय इतिहासातील लोक  ज्यांची  आज आपण आपले आदर्श म्हणून पूजा करतो त्यांनी आपल्या जीवनामध्ये आदर्श वर्तनाची जोपासना करुन संपूर्ण विश्वाला आकर्षित करणारी अशी भारतीय संस्कृती निर्माण केली. त्यामुळे आपली समाज व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था अगदी चांगल्या प्रकारे टिकून आहे. परंतु मागील काही वर्षापासून पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण आपल्या भारतीय संस्कृतीवर होत आहे त्यामुळे भारतीय लोक पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करत त्यामुळे विविध सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. या समस्यांच्या निर्मूलनासाठी पुन्हा नव्याने आपल्या भारतीय संस्कृतीचे जोपासणी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे..यावेळी आयसीटीसी कक्षाच्या वतीने  एड्स प्रतिबंध व नियंत्रण विषयक  विविध पोस्टरचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.जयराम ढवळे, प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. राणी जाधव,आभारप्रदर्शन प्रा. सुप्रिया डोंगरे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक  बहुसंख्येने उपस्थित होते.

Back to top button